प्रदर्शनाच्या एक आठवडाआधी बदलले Emraan Hashmi च्या Cheat India चे शीर्षक; जाणून घ्या काय आहे नवीन नाव
चीट इंडियाचे बदललेले पोस्टर (photo credits: Ellipsis Entertainment)

इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) चा महत्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘चीट इंडिया’ (Cheat India) येऊ घातलाय. मात्र या या चित्रपटामागे लागलेले ग्रहण काही हटायचे नाव घेत नाही. आधी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 25 जानेवारी होती, त्यानंतर ती बदलून 18 जानेवारी करण्यात आली. कारण काय तर त्या दिवशी ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता 1 आठवड्यावर या चित्रपटाचे प्रदर्शन आले असता, चक्क चित्रपटाच्या नावात बदल केला गेला आहे. आता या चित्रपटाचे नाव ‘चीट इंडिया’ ऐवजी ‘व्हाय चीट इंडिया’ (Why Cheat India) असे करण्यात आले आहे. नवीन नावाचे पोस्टरही इम्रान हाश्मीने सोशल मिडियावर पोस्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

Don't ask WHY. But it's WHY. Sigh. #whycheatindia #cheatindia

A post shared by WHY Emraan Hashmi (@therealemraan) on

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) यांनी आक्षेप घेतल्याने निर्मात्यांना हे नाव बदलायला लागले असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे शीर्षक दिशाभूल करणारे आहे असे सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील एका महत्वाच्या मुद्द्याला हात घालण्यात आला आहे. शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर हा चित्रपट भाष्य करतो. इंजीनिअर किंवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची परवानगी मिळवण्यासाठी डमी विद्यार्थ्यांना बसवण्यापासून ते पैसे चारण्यापर्यंत जो काही गैरकारभार चालतो तो या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. (Cheat India ने रिलिज डेट पुढे ढकलली; ‘ठाकरे’ सोबतची टक्कर टळली)

2018 मध्ये जानेवारीतच प्रदर्शित झालेल्या पद्मावतसोबतही असाच अन्याय झाला होता. या चित्रपटामुळे देशात हिंसाचार उफळता होता, त्यामुळे संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाचे नाव पद्मावती ऐवजी पद्मावत असे ठवले. दरम्यान ‘व्हाय चीट इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमिक सेन (Soumik Sen) यांनी केले असून, यात इम्रान हाश्मीसोबत श्रेया धन्वंतरी (Shreya Dhanwanthary) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.