World Theatre Day 2019: मराठी रंगभूमी वर सुरू असलेली ही '5' सध्याची धम्माल नाटकं पाहिलीत का?
Marathi Plays (Photo Credits: Instagram)

International Theatre Day 2019: महाराष्ट्रात रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर दिवशी विष्णूदास भावे (Vishnudas Bhave) यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो मात्र जागतिक स्तरावर रंगभूमी दिनाचं सेलिब्रेशन 27 मार्च दिवशी रंगतं. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने (ITI)1962 पासून 27 मार्च हा दिवस 'जागतिक रंगभूमी दिन' (World Theatre Day) म्हणून साजरा करतं. कलाकाराच्या अभिनयाची खरी कसोटी 'रंगमंचा'वरच होते. या दिवशी रंगभूमीचं महत्त्व विशेष अधोरेखित करण्यासाठी आणि कलेचं हे माध्यम जोपासण्यासाठी जगभरातील एक मान्यवर व्यक्ती

इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटमध्ये आपले विचार मांडते. भारतामध्ये ITI ची शाखा पुण्यामध्येही आहे.

आज सिनेमा, मालिका पासून अगदी डिजिटल मीडियातलं वलय कलाकारांना खुणवत असलं तरीही अनेक मातब्बर कलाकार स्वतःला रंगभूमीवर स्वतःला आजमावून पाहतात. महाराष्ट्रात संगीत नाटकांपासून अगदी बालनाटकांची परंपरा आहे. त्यामुळे आबालवृद्ध मराठी रसिक हमखास नाटकं पहायला जातो. मग सध्या रंगभूमीवर सुरू असलेली ही काही दर्जेदार मराठी नाटकं तुम्ही पाहिली आहेत का? नाटकावर आधारलेले हे '५' सुपरहिट मराठी सिनेमे !

देवबाभळी

 

View this post on Instagram

 

Watch public review on #devbabhali only on #Youtube.com/media bachelors

A post shared by sachin sawate (@sachin_sawate) on

वरपाहता विठ्ठल भक्तीवर वाटणारं हे नाटक स्त्रियांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. अवली आणि रुक्मिणी या दोन भूमिका संबंध नाटकभर रसिकांना खिळवून ठेवतात. या नाटकाची दखल यंदा 'फोर्ब्स' मासिकामध्येही घेण्यात आली आहे.

अलबत्त्या गलबत्त्या

सध्या दहावी-बारवीच्या परीक्षा संपल्या आहेत. इतर शालेय वार्षिक परीक्षा लवकरच सुरू होतील पण यंदा तुमच्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 'अलबत्त्या गलबत्त्या' नाटकं दाखवा.

एका लग्नाची पुढची गोष्ट

 

View this post on Instagram

 

अगदीच वेगाने लग्नाच्या या पुढच्या गोष्टीचा प्रवास सुरू आहे....!! नक्की या. ऑनलाईन बुकिंग : http://bit.ly/EkaLagnachiPudhachiGoshta कथा : इम्तियाज पटेल रूपांतरण, दिग्दर्शन:- अद्वैत दादरकर नेपथ्य : प्रदीप मुळ्ये संगीत : अशोक पत्की प्रमुख भुमिका : प्रशांत दामले, कविता मेढेकर. @damleprashant @kavitamedhekar @adwaitdadarkarofficial #zeemarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

मन्या-मनीची लव्ह स्टोरी आता 20 वर्ष पुढे गेली आहे. त्यामुळे प्रशांत दामले आणि कविता लाड या जोडीचे जर तुम्ही चाहते असाल तर नक्कीच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' पहायला हवं. Eka Lagnachi Pudhchi Goshta मराठी नाटकाने रचला Book My Show वर विक्रम, प्रशांत दामलेंनी मानले चाहत्यांचे आभार

मोरूची मावशी

विजय चव्हाण यांनी अजरामर करून ठेवलेली 'मोरूची मावशी' आता पुन्हा रंगमंचावर सादर होत आहे. विजय चव्हाण यांच्या पश्चात आता भरत जाधव पुन्हा रंगमंचावर 'मोरूची मावशी' साकारणार आहे.

इडीयट्स

 

View this post on Instagram

 

झी मराठीची पुन्हा एक नवी नाट्यप्रस्तुती "इडियट्स" शुभारंभ 3 मार्चपसून...!! आजच Book करा. http://bit.ly/IdiotsPlayZeeMarathi लेखक-दिग्दर्शक: श्रीरंग गोडबोले संगीत दिग्दर्शन: राहुल रानडे नेपथ्य/प्रकाशयोजना: प्रदीप मुळ्ये नृत्य दिग्दर्शन: फुलवा खामकर गायक: अवधूत गुप्ते, सावनी रवींद्र वेशभूषा: गीता गोडबोले कलाकार: सागर कारंडे, स्मिता तांबे निर्मिती: इंडियन मॅजिक आय प्रा. लि. @avadhoot_gupte @rahulbhandare18 @saagar_saggi @smitatambe #ZeeMarathi #IdiotsNatak #MarathiPlay #Theatre 🎭

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

सागर कारंडे आणि स्मिता तांबे ही जोडी मराठी रंगमंचावर 'इडियट्स' हे नाटक घेऊन येत आहे. “Only idiots marry” असा विचार करणारी दोन पात्र एकत्र राहतात कालांतराने लग्नाबद्दलच्या त्यांच्या संकल्पना त्यांना पुन्हा विचार करायला लावतात. करियर, नात्यांबददल बदलत जाणार्‍या आजच्या तरूण पिढीच्या संकल्पना आणि वाढणारा 'लग्न संस्थेबददलचा गोंधळ या नाटकात पहायला मिळणार आहे.

सिनेमा, मालिका किंवा अगदी डिजिटल मीडियामध्येही तंत्रज्ञानाच्या मदतीने कितीही सुपर इफेक्ट्स किंवा कल्पनाशक्ती पलिकडीकडील जग पाहता येत असलं तरीही कलाकारांना लाईव्ह रंगमंचावर पाहता येणं. त्या किमान अडीच ते तीन तासांचा अनुभव हा कलाकरांइतकाच रसिकांनाही समृद्ध करणारा असतो. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा नाटक पाहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा.