Eka Lagnachi Pudhchi Goshta मराठी नाटकाने रचला Book My Show वर विक्रम, प्रशांत दामलेंनी मानले चाहत्यांचे आभार
Eka Lagnachi Pudhchi Goshta (Photo credit : Facebook/prashant Damle)

मराठी रंगभूमीचा बादशहा, विक्रमवीर प्रशांत दामले (Prashant Damle) आणि कविता मेढेकर (Kavita Medhekar)  ही जोडी तब्बल २० वर्षांनी पुन्हा रंगमंचावर आली आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट (Eka Lagnachi Pudhchi Goshta)  हे धम्माल विनोदी नाटक 17 नोव्हेंबरला रंगमंचावर आलं आणि आता ते पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात करत आहे. आजकाल नाटकं, सिनेमा यांची तिकीटविक्री ऑनलाईन माध्यमातून होते. Book My Show या लोकप्रिय Online Ticket Booking APP वर एका लग्नाची पुढची गोष्ट (Eka Lagnachi Pudhchi Goshta)  या नाटकाने पहिला विक्रम रचला आहे. मराठी नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाचBook My Show वर गेले 15 दिवस हे नाटक अव्वल स्थानी आहे.

नाळ, 2.0, ... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर  अशा दमदार  सिनेमांचं आव्हान असूनही एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाला रसिकांचा 'हाऊसफ़ुल्ल प्रतिसाद मिळत आहे. मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय जोडी प्रशांत दामले आणि कविता मेढेकर पुन्हा एकत्र आले आहेत. या नाटकामध्ये ते साकारत असलेल्या मन्या आणि मनी ची पात्र आता संसाराच्या विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचली आहे. Mid life crisis कोणालाच चुकलेला नाही. मग त्यावर उत्तर कसं शोधायचं हे तुम्हाला पहायचं असेल तर ते नक्कीच नाटकातून आणि विनोदी अंगाने तुम्हाला पाहायला मिळेल.

अद्वैत दादरकरने या नाटकाचं दिगदर्शन केलं आहे. 'मला सांगा सुख म्हणजे काय असत? ','ही परी अस्मानीची' ही नाटकातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. नाटकात पुन्हा नव्याने गाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. डिसेंबर महिन्यात या नाटकाचा मराठवाडा दौरा आहे.