मराठी नाट्यगृहाची दूरावस्था ही नाट्य कलाकारांना आणि नाट्यरसिकांना काही नवीन नाही. पैसे भरूनही नाट्यगृहाच्या दूरावस्थेमुळे नाट्यरसिकांना ब-याच समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी आलेल्या कलाकारांनी. याच एक जिवंत उदाहरण पाहायला मिळाले ते डॉ. काशिनाथ घाणेकर (Dr. Kashinath Ghanekar Theatre) नाट्यगृहात. या नाट्यगृहात प्रयोगासाठी गेलेल्या मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) याने नाट्यगृहात कलाकारांना मिळणा-या वागणुकीबद्दल आणि तेथील अनागोंदी कारभारावर भाष्य करत आपला एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात त्याने नाट्यगृहाच्या दूरावस्थेविषयी आगपाखड केली आहे.
या व्हिडिओत 'मी तुम्हाला पावसात भिजलोय, असं वाटत असेल पण असे नसून मी घामाच्या धारांनी भिजून गेलोय असे तो म्हणालाय, पाहा व्हिडिओ
नाट्यगृहाला अनेकदा सांगून एसी बंद ठेवल्याने आपली ही अवस्था झाली आहे, असं भरत पुढे म्हणतोय. नाट्यगृहाच्या कर्मचा-यांकडे तक्रार केले की, आम्हाला उडवाउडवीची उत्तर देतात मात्र पूर्ण भाडे घेऊनही योग्य त्या सोयीसुविधा देत नाही, असेही त्याने सांगितले आहे.
हेही वाचा- मुंबई: मोबाईलच्या व्ययत्यामुळे 'लाईव्ह शो' चा रसभंग टाळण्यासाठी BMC नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवणार?
कित्येकदा तक्रारी करुनही नाट्यगृहाचे कर्मचारी योग्य त्या सोयी सुविधा देत नाही आणि ही अवस्था केवळ डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची नसून अन्य नाट्यगृहांची सुद्धा आहे. त्यामुळे यावर कधी तोडगा काढला जाईल याकडेच सर्वांचे लक्ष लागलय.