
Devoleena Bhattacharjee Announce Pregnancy : हिंदी मालिकेतील अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हीनं आई होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. देवोलीनाने इंस्टाग्रामवर नुकतेच फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये आई होणार असल्याची माहिती दिली आहे. देवोलीना आणि तिच्या पतीने गुड न्यूज दिल्याने त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा- हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे अनेक विक्रम)
यापूर्वी ती बेबी बंममध्ये स्पोट झाल्याने चर्चेत आली होती. परंतु त्यावेळीस तीनं गरोदरपणाची कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. देवोलिना भट्टाचार्जीने इन्स्टांग्रामवर फोटो शेअर केले आहे. ज्यात ती पती आणि पाळीव कुत्र्यासोबत पोज देत आहे. फोटोमध्ये तीने लहान मुलाचे कपडे घेतले आहे ज्यात लिहले की, तुम्ही आता विचारणे थांबवू शकता. फोटोत तीनं हिरवी साडी नेसली आहे. तर पंचामृत विधीसाठी तीनं सिंपल लूक केला आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या फोटोसोबत तीन एक सुंदर पोस्ट लिहले आहे. पोस्ट मध्ये लिहले आहे की, "मातृत्वाचा दिव्य प्रवास पंचामृत विधीने साजरा करत आहे. सुंदर जीवनात आई आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला आरोग्य, समृद्धी आणि आनंद मिळो." आशीर्वाद द्या."तिन दिलेल्या गुड न्यूजनंतर तिच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. देवोलीना आणि शनवाज व्यतिरिक्त, कुटुंबातील इतर सदस्य देखील फोटोंमध्ये दिसत आहेत.