दिल्ली पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेंस विभागाकडून ( Delhi Police's Economic Offences Wing) हरियाणवी गायिका आणि डांसर सपना चौधरी (Sapna Choudhary)च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सपना वर धोकाधाडीचे, फसवणूकीचे आरोप असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिली आहे. सपना चौधरीने कामाचे पैसे घेतल्यानंतर करार तोडल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. Sapna Choudhary New Song 2020: सपना चौधरी चे नवीन गाणे 'बलम अल्टो' झाले सुपरहिट, Video मधील देसी अंदाज चाहत्यांना भावला.
एका कंपनीने सपना चौधरी अअणि तिच्या परिवारावर आरोप लावले आहेत की त्यांनी 50 लाख रूपयांपेक्षा अधिकच्या आर्थिक व्यवहारांमध्ये धोकाबाजी केली आहे. कंपनीचा आरोप आहे की सपना आणि तिचा परिवार यांच्याकडून अनेकदा लाखो रूपये घेण्यात आले आहेत मात्र त्यांनी ते पैसे परत केले नाहीत. दिल्ली पोलिसांनी इंडियन पिनल कोड च्या सेक्शन 420, 120 बी आणि 406 अंतर्गत सपना आणि तिच्या परिवाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Delhi Police's Economic Offences Wing has registered a case against Haryanvi singer and dancer Sapna Choudhary and others on charges of cheating and breaching of trust among others.
— ANI (@ANI) February 11, 2021
सपना चौधरी प्रसिद्ध हरियाणवी डांसर आहे. बिग बॉस या रिएलिटी शो मध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. यानंतर तिची लोकप्रियता घराघरामध्ये पोहचली आहे. तिने अनेक सुपरहीट व्हिडिओजमध्ये काम केले आहे. सपना बॉलिवूडमध्येही झळकली आहे. मात्र तिचा सिनेमा बॉक्सऑफिसवर फार काम करू शकला नाही. लवकरच सपना चौधरी एका क्राईम बेस्ड टीव्ही सीरीजमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे.