दिल्ली बस चित्रपट (फोटो सौजन्य- You Tube)

दिल्लीमध्ये निर्भया (Nirbhaya) हिच्यावर 16 डिसेंबर 2012 रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली असून देशभरात बलात्कारानंतर अनेक आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. त्यामुळे निर्भयाच्या आयुष्यावर आधारित कथेचा दिल्ली बस (Delhi Bus) म्हणून ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दिव्या सिंग दिसणार आहे. तर निलिमा आझमी ही निर्भायाच्या आईची भूमिका करणार आहे. तसेच अंजन श्रीवास्तव आणि संजय सिंग हे सुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत. निर्भया या चित्रपटाचे शारिक मिन्हाज यांनी दिग्दर्शन केले असून तिच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली असल्याचे म्हटले आहे.