Image only representative purpose (Photo credit: pxhere)

देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका विविध उद्योगधंद्यांना बसल्याने मोठे नुकसान झाले आहेत. तसेच शाळा- महाविद्यालय, सिनेमागृ-नाट्यगृह, ओपन पार्क, स्विमिंग पूल सुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याता पार्श्वभुमीवर आता सिनेसृष्टीला सुद्धा कोरोना व्हायरसचा फटका बसला असून मालिका-चित्रपटांचे चित्रिकरण 19 ते 31 मार्च पर्यंत रद्द करण्यात आले आहे. याबाबत इंडियान मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन यांनी माहिती दिली असून त्याबाबतचे परिपत्रक सुद्धा झळकवले आहे.

राज्यातील वाढती कोरोना संक्रमणाच्या रुग्णांची संख्या पाहता आणि त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विविध प्रकारे काळजी घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन सराकरकडून करण्यात येत आहे. तर आता सिनेसृष्टीतील सर्व मालिका, बेव सिरिज, चित्रपट यांचे चित्रिकरण रद्द करण्यात आले आहे. तसेच सरकारने राज्यात वैद्यकीय आणीबाणी सुद्धा जाहीर केली आहे.(कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्याची राज्य सरकारकडून सुचना)

देशात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित 100 रुग्ण आढळून आले असून सरकारकडून खबरदारी घेण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण झाल्याची 30 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर सरकारने नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांना सुद्धा 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहिर केली आहे. ऐवढेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी जाळ्याचे टाळावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तर मुंबईतील राणीबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुण्यात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा बंद केल्यानंतर आता अंगणवाड्या सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे.