अभिनेत्री बिंगबिंग बेपत्ता
फानॅ बिंगबिंग (Picture Courtesy: Instagram)

चीनमधील आघाडीची अभिनेत्री फॅन बिंगबिंग बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या १ जुलैपासून ती बेपत्ता आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले होते की, बिंगबिंग हिचे सामाजिक कार्यात असणारे योगदान केवळ शून्य होते. तसेच, काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही प्रेझेंटरने तिच्यावर करचोरीचाही आरोप केला होता. या सर्व गोष्टींनतर अधिकाऱ्यांनी बिंगबिंगला तुरुंगात टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फॅन बिंगबिंग ही २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक्स मॅन: डे ऑफ फ्यूचर पास्ट' या हॉलिवूडपटात झळकली होती. त्यानंतर ती बरीच चर्चेत आली. सरकारी चीनी वृत्तपत्र 'चायना डेली'ने म्हटले आहे की, प्रोफेशनल लाईव्ह आणि चॅरिटीच्या कामात बिंगबिंग ही सेलिब्रेटींमध्ये १००व्या स्थानावर आहे. त्यातच तिच्यावर टीव्ही प्रेझेंटरने करचोरीचा आरोपही लावला आहे. त्यामुळे करचोरी आणि बिंगबिंग हिचे सामाजिक कार्यातील शून्य योगदान यांचा काही संबंध आहे का? याबाबत चीन इंटरनेट यूजर्स पडताळा करत आहेत. दरम्यान, बिंगबिंगच्या स्टुडिओने करचोरीचा आरोप फेटाळला आहे.

फॅन बिंगबिंग ही लोकप्रिय अभिनत्री आहे. ती गायिका आणि मॉडेलही आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिच्या नावाची जोरदार चर्चा असते. हॉलिवूड चित्रपट 'एक्स मॅन'मधील तिने साकारलेली ब्लिंकची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. चीनमधील अभिनेत्रींपैकी सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणूनही बिंगबिंगला ओळखले जाते. बेपत्ता होण्यापूर्वी ती लहान मुलांच्या हॉस्पीटलमध्ये शेवटचं दिसली होती. दरम्यान, अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तिला नजरकैदेत ठेवले असून, लवकरच ती कायदेशीर मार्ग अवलंबेल असं वृत्त 'सेक्युरिटी डेली'ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलं होतं. मात्र, त्यानंतर हे वृत्त संकेतस्थळावरून हटविण्यता आले.