सतत सुंदर दिसण्याच्या दबावामुळे डिप्रेशन येतं; कुशल पंजाबी यांच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमित राघवन हिची भावुक फेसबुक पोस्ट व्हायरल
Chinmayee Sumit (Photo Credits: Instagram)

टेलिव्हिजन अभिनेता कुशल पंजाबी (Kushal Punajabi) याने काल एकाएकी आत्महत्या केल्याने मनोरंजन विश्वात एकाच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्येची बातमी पसरताच, अनेक टीव्ही कलाकारांनी सोशल मेडियावर हळहळ व्यक्त केली आहे तर त्याच्या इंडस्ट्रीतील काही मित्रांना आपले अश्रू अनावर झाले. यामध्येच मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमीत (Chinamyee Sumit) हिने देखील एक खास पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .कुशलच्या निधनावर बोलत असतंच चिन्मयीने आपल्याही मनातील विचार देखील बोलून दाखवले आहेत. "मनोरंजन विश्वात टिकून राहायचे असल्यास सतत तुम्ही कसे दिसता अयाकडे लक्ष दिले जाते, कामाच्या वातावरणात जरी हा प्रकार कमी घडत असला तरी बाहेर लोकांमध्ये वावरताना याचा अधिक प्रत्यय येतो अशातच सुमित (Sumit Raghvan) (चिन्मयी चे पती) जास्त देखणा असल्याने त्याच्याशी देखील तुलना केली जाते आणि कुठेतरी मनात नैराश्याची खूण जाणवते अशा आशयाची चिन्मयी हिची पोस्ट आहे.अभिनेता कुशल पंजाबी याची राहत्या घरी आत्महत्या; करणवीर बोहरा याने शेअर केली भावनिक पोस्ट

अनेकदा चित्रपट नाट्य सृष्टीतील मंडळींना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते, यामुळे आत्मविश्वास खचतो पण हे सामन्यांना जाणवत सुद्धा नाही अशा वेळी मानसिक दबाव वाढल्याने आयुष्य संपवून टाकू असे विचार साहजिकच डोक्यात येत असणार पण या सर्वांच्या पलीकडे आपलं वैयक्तिक असं जग आहे आणि त्यात जर तणाव जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी आपण विचार केला पाहिजे, आत्महत्या हा पर्याय नाही असा अप्रत्यक्ष सल्ला देताना चिन्मयी हिने लिहिलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

काय आहे चिन्मयी सुमित हिची पोस्ट?

दरम्यान, कुशल पंजाबी याचा मृत्यू हा अत्यंत धक्कादायक होता, त्याने लिहिलेल्या सुसाईड नोट मधून अनेक अंदाज बांधले जात आहेत, त्याच्या शवि लग्नामुळे त्याला हे पाऊल उचलावे लागले असा दावा काही माध्यमातून करण्यात आला आहे.