KGF 3 Teaser (PC - Twitter)

KGF 3 Teaser: गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी, यश, रवीना टंडन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला KGF 2 हा यशस्वी चित्रपट प्रशांत नील यांनी प्रदर्शित केला. एक वर्षानंतर, त्याच्या वर्धापनदिनानिमित्त, निर्मात्यांनी एक टीझर जारी केला आणि सोशल मीडियावर KGF 3 ची घोषणा केली. चाहत्यांनी या चित्रपटाच्या टीझरला प्रतिसाद दिला असून आता चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. KGF 3 चा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर #KGF3 ट्रेंड होत आहे. चाहते या चित्रपटासाठी अत्यंत उत्सुक आहेत.

होंबळे फिल्म्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर यशच्या अॅक्शन फिल्मचा पहिला टीझर रिलीज करून KGF चॅप्टर 3 बद्दलच्या अफवांना पुष्टी दिली आहे. या भागात रॉकी भाई 1978-1981 मध्ये कोठे होता ते सांगण्यात येणार आहे. प्रॉडक्शन कंपनीने आधीच्या भागाचे जागतिक यश देखील साजरे केले आहे. परंतु KGF चॅप्टर 3 साठी अद्याप कोणतीही अधिकृत प्रकाशन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - Most Influential People in 2023: जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये राजामौली आणि शाहरुख खानचा समावेश; टाईम मासिकाने जाहीर केली 100 लोकांची यादी)

या टीझरवरून असं दिसून येत आहे की, प्रशांत नील KGF: अध्याय 3 साठी तयारी करत आहे. क्लायमॅक्स सीनमध्ये रॉकीला समुद्रात बुडताना पाहून प्रत्येक चाहत्याला रॉकीचं पुढं काय झालं असा प्रश्न पडला आहे. सोशल मीडियापासून ते इंटरनेट जगतात, लोक रॉकीच्या जगण्याची आणि KGF-3 च्या कथानकाबाबत त्यांच्या शक्यता व्यक्त करत आहेत. मात्र, शुक्रवारी, चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे, निर्मात्यांनी 2 मिनिटांच्या व्हिडिओमधून केजीएफ 3 चा टीझर रिलीज केला आहे. ज्यामुळे रॉकीबद्दल जाणून घ्यायची प्रेक्षकांनी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार KGF 3 चे शूटिंग 2025 मध्ये सुरू होईल. यशचा हा 19 वा चित्रपट असेल. 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज झालेल्या 'KGF: Chapter 2' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 168 मिनिटांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना इतके मंत्रमुग्ध केले की, जगभरातील चित्रपटाने 1250 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.