Most Influential People in 2023: जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये राजामौली आणि शाहरुख खानचा समावेश; टाईम मासिकाने जाहीर केली 100 लोकांची यादी
SS Rajamouli, Shah Rukh Khan (PC - Facebook)

Most Influential People in 2023: चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समाविष्ट आहेत. टाइम मॅगझिनने (Time Magazine) 2023 साठी जाहीर केलेल्या यादीत दोघांची नावे समाविष्ट केली आहेत. लेखक सलमान रश्दी आणि टीव्ही होस्ट आणि न्यायाधीश पद्मा लक्ष्मी यांचाही या यादीत समावेश आहे.

या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे राजे चार्ल्स, सीरियन वंशाच्या जलतरणपटू आणि सामाजिक कार्यकर्त्या सारा मर्दिनी आणि युसरा मर्दिनी आणि अब्जाधीश एलोन मस्क यांचा समावेश आहे. आलिया भट्टने टाइमच्या यादीसाठी ऑस्कर-विजेता चित्रपट RRR चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांची व्यक्तिरेखा लिहिली आहे. (हेही वाचा - Mika Singh ने Doha Airport वर वापरले भारतीय चलन वापरू शकत असल्याने आनंद केला शेअर; PM Narendra Modi यांचेही मानले आभार (Watch Video))

आलियाने लिहिले की, 'त्याला प्रेक्षकांची नाडी माहीत आहे. मी त्याला मास्टर स्टोरीटेलर म्हणते. भारत हा विविधतेने भरलेला देश आहे आणि राजामौली आपल्या सर्वांना चित्रपटाद्वारे जोडतात.' याशिवाय, बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुखची व्यक्तिरेखा अभिनेत्री दीपिका पदुकोणने लिहिली आहे. (हेही वाचा - Suhana Khan Khan बनली ब्युटी ब्रँडची अॅम्बेसेडर, Shah Rukh Khan ने ट्विट करत केले अभिनंदन)

दीपिका पदुकोण शाहरुखला सर्वकालीन महान अभिनेता म्हटलं आहे. दीपिका नुकतीच शाहरुखसोबत पठाण या सुपरहिट चित्रपटात दिसली होती. दीपिकाने लिहिले की, 'शाहरुखची गणना नेहमीच सर्वकालीन महान अभिनेत्यांमध्ये केली जाईल. त्याची सभ्यता आणि औदार्य हे त्याला वेगळे करते.