यशराज फिल्म्सकडून प्रेक्षकांना नववर्षाचे खास गिफ्ट! सोशल मिडियाद्वारे केली या वर्षी प्रदर्शित होणा-या '5' बिग बजेट चित्रपटांची घोषणा
Yash Raj Films (Photo Credits: FB)

बॉलिवूडमध्ये (Bollwood) एकदा तरी यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) बॅनरखाली काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा अनेक कलाकारांची असते. यशराज फिल्म्स ही केवळ कंपनी नसून ते नवोदित कलाकारांचे प्रशिक्षणाचे केंद्र आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले. त्यात यशराज फिल्म्सच्या अंतर्गत येणा-या चित्रपटांचाही समावेश आहे. मात्र आता नववर्षाच्या सुरुवातीच्या काळातच यशराज फिल्म्सने यावर्षी प्रदर्शित होणा-या 5 मोठ्या चित्रपटांची घोषणा केली आहे.

यशराज फिल्म्सने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून या चित्रपटांची घोषणा केली आहे. यात बंटी और बबली (Bunty Aur Babli 2) या चित्रपटाच्या सिक्वेलचाही समावेश आहे.हेदेखील वाचा- Jaya Bachchan to Make Comeback: जया बच्चन मराठी चित्रपटाद्वारे करणार मोठ्या पडद्यावर पुनरागमन; तब्बल 7 वर्षांनी दिसणार चित्रपटात

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

येथे पाहा यादी

1. संदिप और पिंकी फरार

प्रमुख कलाकारः अर्जुन कपूर, परिणिती चोप्रा

प्रदर्शनाची तारीखः 19 मार्च 2021

2. बंटी और बबली-2

प्रमुख कलाकारः सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघ

प्रदर्शनाची तारीखः 23 एप्रिल 2021

3. शमशेरा

प्रमुख कलाकारः रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त

प्रदर्शनाची तारीखः 25 जून 2021

4. जयेशभाई जोरदार

प्रमुख कलाकारः रणवीर सिंग, बोमन इराणी, रत्ना पाठक शाह, शालिनी पांडे

प्रदर्शनाची तारीखः 27 ऑगस्ट 2021

5. पृथ्वीराज

प्रमुख कलाकारः अक्षय कुमार, संजय दत्त, मनुशी छिल्लर, सोनू सूद

प्रदर्शनाची तारीखः 5 नोव्हेंबर 2021

हे पाचही बिग बजेट फिल्म असून या हे सर्व सिनेमागृहातच प्रदर्शित होतील हे वेगळं सांगायची गरज नाही. तगडी स्टारकास्ट आणि चित्रपटांच्या तारखांमुळे याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे येणा-या काही दिवसांत कळेल.