बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जया बच्चन (Jaya Bachchan) गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहेत. त्यांचे चाहतेदेखील बर्याच दिवसांपासून त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. आता समोर येत असलेल्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. होय, जया बच्चन जवळपास 7 वर्षानंतर अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन करणार आहेत. यावेळी जया बच्चन हिंदी चित्रपट नाही तर एका मराठी चित्रपटामधून पडद्यावर परत येणार आहेत. जया बच्चन पहिल्यांदाच मराठी प्रकल्पात काम करणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, शेवटचे जया बच्चन यांनी 2012 मध्ये दिवंगत रितूपर्णो घोष यांच्या ‘सनग्लासेस’साठी शूट केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत नसीरुद्दीन शाह देखील होते. चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, परंतु चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. आता जया पुन्हा एकदा परत येत आहेत.
या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे करीत आहेत, ज्यांनी आतापर्यंत 'शेवरी', 'अनुमती' सारख्या सुमारे 50 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अहिरे 20 दिवसात जया बच्चनसोबत शूटिंग पूर्ण करणार आहेत. बर्याच दिवसानंतर जया बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहणे हे त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी ठरणार नाही. (हेही वाचा: Zombivli Teaser: मराठीतील पहिला झोम्बीपट 'झोंबिवली' सिनेमाचा टीझर आऊट (Watch Video)
1973 मध्ये अमिताभ बच्चनसोबत लग्न केल्यानंतर जया बच्चन चित्रपटापासून दूर गेल्या होत्या. लग्नानंतर त्यांनी 'सिलसिला', 'कभी खुशी कभी गम', 'लागा चुनरी में डाग', 'काल हो ना हो' यासारखे निवडक चित्रपट केले. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी अभिनयासोबतच राजकारणाद्वारे लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या त्या कदाचित चित्रपटांमध्ये दिसत नसतील, परंतु बर्याचदा त्यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर त्यांच्यासोबत फोटो शेअर करत असते.