Yami Gautam-Aditya Dhar Wedding (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने 2 दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याच्याशी विवाह केला. अनपेक्षितपणे यामी आणि आदित्य यांची लग्न झाल्याची बातमी सर्व चाहत्यांसाठी धक्कादायक होती. कारण या दोघांनी खाजगीत अगदी गुपचूपपणे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांच्या लग्नाची थोडीशी चुणूक मिडियासह कुणालाही लागू दिली नाही. यामीने हिमाचलमध्ये आपल्या गावी आपल्या कुटूंबाच्या उपस्थित आदित्यशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर आपली लाडकी यामी गौतम कशी दिसते हे पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये असेलच. तुमची ही उत्सुकता कमी करण्यासाठी सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला यामी गौतमचा हा फोटो नक्की पाहा.

या फोटोमध्ये यामी गौतमने हिरव्या रंगाची साडी, हातात लाल चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरले आहे. लग्नानंतरचा तिचा नवविवाहित स्त्रीच्या अवतारातील लूक पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.हेदेखील वाचा- Yami Gautam आणि दिग्दर्शक Aditya Dhar यांनी गुपचुप लग्न केल्याचे कळल्यानंतर बॉलिवूडकरांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Gitesh Sharma (@royal_group3333)

यामी आणि आदित्यने आपल्या कुटुंबियांसमवेत कोणताही बोलबाला न करता गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यानंतर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी यामी-आदित्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काल लग्नाचे फोटोज शेअर केल्यानंतर यामीने आज मेहंदीचे फोटोज (Mehndi Photos) सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात यामीसोबत आदित्य देखील दिसत आहे.

या फोटोत यामीने नारंगी रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला असून आदित्यने निळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. यामीच्या हातावरील मेहंदी सुरेख आहे. यात दोघेही अगदी आनंदात दिसत आहेत. या फोटोंना सुमारे 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकजण कमेंट करुन आपली पसंती दर्शवत आहेत.