Yami Gautam आणि दिग्दर्शक Aditya Dhar यांनी गुपचुप लग्न केल्याचे कळल्यानंतर बॉलिवूडकरांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
Yami Gautam-Aditya Dhar Wedding (Photo Credits: Instagram)

उरी, काबिल, बदलापूर यांसारखे अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटविणा-या यामी गौतमने (Yami Gautam) उरी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याच्याशी अत्यंत खाजगीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नाचा फोटो यामीने सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला. अनेक बॉलिवूड स्टार्सने या नवविवाहित दाम्पत्याला सोशल मिडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. यामीने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केल्यानंतर या बातमीला दुजोरा दिला.

यामीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर आदित्य धर पांढ-या रंगाच्या शेरवानीमध्ये आणि डोक्यावर फेटा बांधून तिच्या बाजूला बसून एकमेकांकडे बघून खूप गोड हसताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Yami Gautam-Aditya Dhar Wedding: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम उरीचे दिग्दर्शक Aditya Dhar यांच्या सोबत अडकली विवाहबंधनात

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Yami Gautam Wedding (Photo Credits: Instagram)

अभिनेता कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, ताहिरा कश्यप अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

यामी आणि आदित्यने २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.