World's Most Admired Men and Women: जगातील सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीमध्ये बॉलिवूडमधील Amitabh Bachchan, Shahrukh Khan, Priyanka Chopra, Deepika Padukone यांचा समावेश, जाणून घ्या संपूर्ण यादी
Amitabh Bachchan, Shahrukh Khan, Priyanka Chopra, Deepika Padukone (File Image)

जगभरात वर्षभर अनेक गोष्टींचे सर्वेक्षण केले जाते, मात्र आपल्यासाठी हे पाहणे खास आहे की यामध्ये एखाद्या भारतीयाने स्थान मिळवले आहे की नाही. आता जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांची व महिलांची (World's Most Admired Men and Women) यादी समोर आली आहे. यामध्ये अनेक भारतीयांनी स्थान मिळवले आहे. YouGov यांच्यातर्फे हे सर्वेक्षण केले गेले आहे. यामध्ये उद्योगपती, खेळ, चित्रपट, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील अनेक भारतीय लोकांना स्थान मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यामध्ये 4 थे स्थान मिळाले आहे.

बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर, जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या (World's Most Admired Men) यादीमध्ये 14 व्या स्थानावर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आहेत व 17 व्या स्थानावर शाहरुख खान (Shahrukh Khan) आहे. तर जगातील सर्वाधिक प्रशंसनीय महिलांच्या (World's Most Admired Women) यादीमध्ये 15 व्या स्थानावर प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आहे व 16 व्या स्थानावर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आहे.

पुरुषांच्या यादीत प्रथम स्थानावर बराक ओबामा आहेत, तर त्यांची पत्नी मिशेल ओबामा महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

पुरुषांच्या यादीमध्ये पहिल्या 20 मध्ये, बराक ओबामा, बिल गेट्स, जिनपिंग, नरेंद्र मोदी, जॅकी चेन, क्रिस्टियानो रोनाल्डो, जॅक मा, दलाई लामा, इयॉन मस्क, केनू रीव्ह्ज, लिओनेल मेस्सी, व्लादिमीर पुतिन, मायकेल जॉर्डन, अमिताभ बच्चन, डोनाल्ड ट्रम्प, विराट कोहली, शाहरुख खान, पोप फ्रान्सिस, रेसेप तैयिप एर्दोआन आणि जोको विडोडो यांचा समावेश आहे. (हेही वाचा: अभिनेत्री दीपिका पादुकोण पाच तासांच्या चौकशीनंतर अखेर NCB कार्यालयातून बाहेर पडली, ड्रग्ज प्रकरणाबाबत झाली चौकशी)

महिलांच्या यादीमध्ये पहिल्या 20 मध्ये, मिशेल ओबामा, अँजेलीना जोली, राणी एलिझाबेथ ||, ओप्राह विन्फ्रे, जेनिफर लोपेझ, एम्मा वॉटसन, स्कारलेट जोहानसन,  पेंग लियुआन, टेलर स्विफ्ट, शकीरा, बियॉन्से, अँजेला मर्केल, हिलरी क्लिंटन, मलाला युसूफझई, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, सुधा मूर्ती, ग्रेटा थनबर्ग, मेलेनिया ट्रम्प आणि एलेन डीजेनेरेस यांचा समावेश आहे.