बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येने त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. तर बॉलिवूडमध्ये सुरु असेलेला नेपोटिजम वाद जोर धरू लागला. सुशांतच्या निधनांतर अनेक कलाकार, दिग्दर्शक, गायक धक्कादायक खुलासे सोशल मिडियाच्या माध्यमातून करत आहेत. यामुळे अनेक कलाकार सोशल मिडियावर ट्रेंड देखील होत आहे. यात आता अजून एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे अर्जुन कपूर (Arjun Kapoor). ट्विटरवर सध्या #ArjunKapoor ट्रेंड होत आहे. याला कारणीभूत आहे लेखक चेतन भगत याची पोस्ट.
लेखक चेतन भगत याच एक जुनं ट्विट सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लिहिलेल्या पुस्तकावर 'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट बनविण्यात आला होता. मात्र या चित्रपटासाठी आधी सुशांत सिंह राजपूतची निवड झाल्याचं समजतंय.
पाहा काय आहे ही पोस्ट:
So happy to share @itsSSR will play lead in @mohit11481 directed Half Girlfriend. Shooting begins 1Q16. https://t.co/dUHSVZ2FQ5
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) November 7, 2015
हेदेखील वाचा-करण जौहर, आलिया भट्ट आणि करिना कपूर यांनी ट्रोलर्सला कंटाळून घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!
यासंदर्भातील चेतन भगत यांचा जुना ट्विट पुन्हा ट्रेण्ड होत असून नेटकरी अर्जुन कपूर व घराणेशाहीवर टीका करत आहेत.
And this is Nepotism Arjun Kapoor @arjunk26 so shameful #boycottstarkids https://t.co/PhMVroixZP
— Aarzoo (@amazing_aarzoo) June 24, 2020
See how nepotism works in corrupted Bollywood ,mota Arjun Kapoor got this film by removing Sushant Singh Rajput #PapaHainNa pic.twitter.com/bQ54R2VKgF
— Aditya (@Aditya16611643) June 23, 2020
मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूतची निवड झाली, असं ट्विट चेतन भगतने केलं होतं. मात्र ऐनवेळी काय झालं आणि सुशांतची जागा अर्जुन कपूरने का घेतली यामागचं कारण अद्याप अस्पष्टच आहे.
त्यामुळे चेतन भगत चे हे पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. सुशांतची जागा अर्जुन कपूरने का घेतली असा सवाल आता नेटकरी करत आहेत. याच कारणामुळे अर्जुन कपूर नावाचे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यावरुन नेपोटिझम हा प्रकार आणखीनच वाढू लागला आहे. मात्र यशाच्या शिखरावर पोहचलेल्या सुशांतने आत्महत्या का केली असावा हा सवाल मात्र अनुत्तरितच आहे.