अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही प्रकार चव्हाट्यावर आला आणि दिवसेंदिवस या प्रकाराने एवढा जोर धरला की सोशल मिडियावर बॉलिवूडमधील स्टारकिड्सला ट्रोल करु लागले. या सर्वाला कंटाळून बॉलिवूडमधल्या काही स्टार किड्सने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जौहर (Karan Johar), अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील कमेंट सेक्शन युजर्ससाठी बंद केले आहे. ज्यामुळे स्टार किड्सला फॉलो करत असलेल्या लोकांपैकी अन्य कोणीही त्यांच्या पोस्टवर कमेंट करु शकणार नाही.
सुशांतच्या निधनाने बॉलिवूडमधील घराणेशाही (Nepotism) हा वाद जोर धरू लागला. यामुळे अनेक स्टारकिड्स ट्रोलर्सच्य विचित्र कमेंट्सला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक युजर्सनी काही स्टारकिड्सला अनफॉलो केले आहे. तर काहींनी त्यांच्यावर कमेंट करुन त्यांना खडे बोल सुनावले आहे. यामुळे करण, आलिया आणि करीना हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
करण जौहर सुशांतच्या निधनानंतर बराच ट्रोल झाला असून त्याचे इन्स्टावरचे फॉलोअर्सही कमी झाले आहेत.
करण, आलिया आणि करीनासोबत शाहरुखनची मुलगी सुहाना खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटचे कमेंट्स सेक्शन बंद केले आहे.
यांच्यावर सोनाक्षी सिन्हा ने तर चक्क आपले ट्विटर अकाउंट बंद केले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने याबाबत माहिती दिली आहे.