Dabangg 3 सिनेमात सलमान खान सोबत मलायका अरोडा, करीना कपूर नाही तर 'ही' हॉट अभिनेत्री लावणार आयटम सॉन्गमध्ये ठुमके!
Salman Khan & Warina Hussain (Photo Credits: Instagram)

सलमान खान (Salman Khan) याच्या 'दबंग 3' (Dabangg 3) सिनेमाचे शुटींग सध्या जोरात सुरु आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सिनेमाचे शूटिंग सुरु झाले होते. त्यानंतर सलमान खान आपल्या 'भारत' (Bharat) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. याच दरम्यान सलमान खान याच्या दबंग 3 सिनेमातील आयटम सॉन्गची ही जोरदार चर्चा होती. या सिनेमात आयटम सॉन्गमध्ये कोण झळकणार? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. दबंगमध्ये मलायका अरोरा तर दबंग 2 मध्ये करीना कपूर आयटम सॉन्गमध्ये ठुमके लावताना दिसल्या. (Dabangg 3 Release Date: 20 डिसेंबरला सलमान खान घेऊन येणार 'दबंग 3')

मीडिया रिपोर्ट्नुसार, दबंग 3 मधील आयटम सॉन्गमध्ये लवयात्री (LoveYatri) सिनेमातील अभिनेत्री वरीना हुसैन (Warina Hussain) सलमानसोबत ठुमके लावताना दिसणार आहे. आयटम सॉन्गचे शूटिंग पूर्ण झाले असून वैभवी मर्चेंट हिने नृत्य दिग्दर्शन केले आहे. यात गाण्यात प्रेक्षकांना सलमान आणि वरीना हिची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी या आयटम सॉन्गसाठी मौनी रॉय हिच्या नावाची चर्चा होती. मात्र नंतर सलमानने वरीना हुसैन हिला संधी दिली. या सिनेमातून महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वामी देखील सिनेसृष्टीत पर्दापण करणार असल्याचे बोलले जात आहे.