War Movie Song Jai Jai Shiv Shankar: 'जय जय शिवशंकर' या गाण्यातून सर्वांना चढणार ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या अफलातून डान्सचा रंग
Hrithik and Tiger Song in War (Photo Credits: Youtube)

बॉलिवूडचे दोन हँडसम हंक अभिनेते ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांची प्रमुख भूमिका असलेला 'वॉर' (War) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अॅक्शन्स सीन्स आणि अफलातून डान्समध्ये अव्वल असलेले बॉलिवूडचे 2 मातब्बर कलाकार ऋतिक आणि टायगर हे प्रथमच एकत्र झळकणार असल्याने सर्व चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागलीय. नुकतेच अभिनेत्री वाणी कपूर आणि ऋतिक रोशन यांचे या चित्रपटातील 'घुंगरु' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाचे आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'जय जय शिवशंकर' असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात ऋतिक आणि टायगरचा भन्नाट डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे.

कुमार या गाण्याचे गीतकार असून विशाल-शेखर (Vishal-Shekhar) या गाण्याचे संगीतकार आहेत. तर विशाल ददलानी (Vishal Dadlani) आणि बेनी दयाल (Benny Dayal) यांनी हे गाणे गायिले आहे. हे गाणे ऐकताच एक प्रकारचे स्फुरण चढेल असे या गाण्याचे संगीत आहे.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- War Movie 'Ghungroo' Song: ऋतिक रोशन- वाणी कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारे 'घुंगरू' गाणे प्रदर्शित

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शक असून आदित्य चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'वॉर' हा चित्रपटहोणार आहे. वाणी कपूर चा ही यात हॉट लूक पाहून तिची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

यशराज फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात आशुतोष राणा, विनय पाठक हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे सीन पोर्तुगालची सर्वात उंच टेकडीवर 'सेरा दा एस्ट्रेला' येथे चित्रित करण्यात आले आहे. गुरुशिष्याची जबरदस्त टशन असलेला हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.