War Movie 'Ghungroo' Song: ऋतिक रोशन- वाणी कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारे 'घुंगरू' गाणे प्रदर्शित

चाहत्यांसाठी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 'घुंगरु' (Ghungroo) असे या गाण्याचे नाव बोल असून यात ऋतिक आणि वाणीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

War Movie 'Ghungroo' Song: ऋतिक रोशन- वाणी कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारे 'घुंगरू' गाणे प्रदर्शित
Ghungroo Song In War (Photo Credits: YouTube)

बॉलिवूड मधील दोन हँडसम हंक ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांची जबरदस्त केमिस्ट्री आणि भन्नाट अॅक्शन सीन्स असलेल्या 'वॉर' (War) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या दोघांसोबत या चित्रपटात झळकणार आहे अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) . हे तिघेही डान्सच्या बाबतीत अव्वल असल्यामुळे या चित्रपटातील त्यांचा डान्स किंवा गाणे कधी पाहायला मिळेल यांची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अशा चाहत्यांसाठी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 'घुंगरु' (Ghungroo) असे या गाण्याचे नाव बोल असून यात ऋतिक आणि वाणीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

या गाणे ऐकताच तुम्हाला जुन्या मराठी आणि हिंदी गाण्याची झलक पाहायला मिळेल. या गाण्यात वाणी-ऋतिकचा अफलातून डान्स पाहायला मिळणार आहे. पाहा व्हिडिओ

घुंगरू गाणे: 

हे गाणे कुमार यांनी लिहिले असून विशाल-शेखर ही जोडी या गाण्याचे संगीतकार आहेत. तर हे गाणी अरिजीत सिंह आणि शिल्पा राव यांनी गायिले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'वॉर' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. वाणी कपूर चा ही यात हॉट लूक पाहून तिची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

हेही वाचा- War Trailer: गुरु-शिष्याची जोरदार टशन घेऊन आलाय ऋतिक रोशन -टायगर श्रॉफ च्या 'War' चा धमाकेदार ट्रेलर

यशराज फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात आशुतोष राणा, विनय पाठक हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे सीन पोर्तुगालची सर्वात उंच टेकडीवर 'सेरा दा एस्ट्रेला' येथे चित्रित करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2019 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).