बिग बजेट आणि फुल ऑन ऍक्शन असलेला टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन मधील 'वॉर' आज देशभर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर तर लोकांच्या पसंतीस पडला पण सिनेमाही तितकाच प्रेक्षकांचं मन जिंकेल यात शंका नाही. चित्रपटात हृतिक रोशन स्पेशल एजंट कबीरच्या भूमिकेत दिसत आहे तर टायगर श्रॉफ त्याच्या ज्युनिअर अर्थात खालिदची भूमिका साकारत आहे. कथानकानुसार खालिद कबीरचा शोध घेण्यासाठी निघतो आणि दोघं समोर आल्यावर त्यांच्यात का आणि कशा पद्धतीने वॉर होतो हे या सिनेमात पाहायला मिळेल.
ऍक्शन आणि रोमान्स याची योग्य सांगड असलेला व त्याचसोबत बॉलीवूडचे दोन हँडसम हंक्स एकत्र हिंदीच्या रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार म्हंटल्यावर हा सिनेमा पाहायचा मोह कोणालाच आवरणार नाही हेच खरं. पण अजूनही हा सिनेमा पाहायला जावं की नाही या संभ्रमात जर तुम्ही असाल तर नक्की वाचा War सिनेमाचा हा खास Meta Review
Times of India
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिव्ह्युनुसार हा सिनेमा म्हणजे दोन्ही कलाकारांच्या फॅन्ससाठी एक पर्वणी आहे. तसेच 90 च्या दशसकतील सुभाष घई यांच्या 'खलनायक'मधील जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांची आठवण करून देणारा सिनेमा आहे.
Times Now
वॉर हा सिनेमा जरी लाईफ चेंजिंग अनुभव नसला तरी मनोरंज, शॉक व्हॅल्यू आणि धमाल याची योग्य सांगड घालणारा आहे. तसेच टाइम्स नाऊने टायगर श्रॉफ आणि हृतिक मधील धमाकेदार चुरस याचे कौतुक केले आहे.
Pinkvilla
'धूम' आणि 'फास्ट अँड फ्युरिअस'च्या सिने चाहत्यांसाठी वॉर म्हणजे एक पर्वणी असल्याचं पिंकविला यांनी नमूद केलं आहे.
India TV
इंडिया टीव्हीने दिलेल्या रिव्ह्युनुसार हा एक ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. हृतिक आणि टायगर दोघांनीही त्यांचे बेस्ट परफॉर्मन्स दिले आहेत. चित्रपटातील ऍक्शन सिक्वेन्स आणि कथानकाचा शेवट सगळ्यांनाच भारावून टाकतील.