पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रुप साकारण्यासाठी विवेक ओबेरॉयला लागले तब्बल 6 तास, पाहा व्हिडिओ
Vivek Oberoi starrer PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाची बातमी मिळते न मिळते तोच देशासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज प्रदर्शित झालेला 'पीएम नरेंद्र मोदी' (PM Narendra Modi) हा चित्रपट. पुन्हा मोदी सरकार येणे आणि हा चित्रपट प्रदर्शित होणे म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याने ह्या चित्रपटात मोदींची भूमिका साकारली असून ह्या भूमिकेसाठी त्याने जीव तोडून मेहनत घेतलीय. विवेक ओबेरॉयला मोदींच्या रुपात आणण्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत तसेच खुद्द विवेक ओबेरॉयने घेतलेली मेहनतीची झलक तुम्हाला पाहायला मिळेल ती ह्या मेकिंगच्या व्हिडियोमधून, पाहा कसा घडला मोदींच्या रुपातला विवेक ओबेरॉय.

पीएम नरेंद्र मोदी मेकओव्हर (Making):

हा चित्रपट जितका आमच्यासाठी आव्हानात्मक होता, त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक विवेक ओबेरॉयला मोदींचा चेहरा देणे हे होते असं ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी सांगितले. नरेंद्र मोदी ही व्यक्तीच इतकी मोठी आहे की, त्यांच्या चेह-यामधूनच त्याचे भाव-स्वभाव, त्यांचे व्यक्तिमत्व दिसून येते. त्यामुळे असा दमदार चेहरा कृत्रिम मेकअपच्या साहाय्याने बनवूम विवेक ओबेरॉयवर तो लावणे हे खूपच चॅलेंजिंग होते. असे ह्या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग म्हणाले. पहिल्या प्रयत्नात जेव्हा समाधानकारक चेहरा निर्माण करता आला नाही, तेव्हा चक्क हा चित्रपटच करु असे हे टप्प्यांवर जाऊन आम्ही विचार केला असे निर्माते संदीप सिंग म्हणाले. मात्र रंगभूषाकार प्रीती यांच्या अथक प्रयत्नांनी हवा तसा आणि तसाचा चेहरा अखेर आपल्या समोर आला.

PM Narendra Modi Trailer 2: शंखाच्या निनादाने दुमदुमून उठणारा 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर

हा मेकअप लावण्यासाठी तब्बल 5 ते 6 तास लागले असून त्या मेकअपमध्ये केवळ 5-6 तासच शूटिंग करता येते होते. त्यामुळे विवेक ओबेरॉयनेही ह्या मेकअपसाठी फार मेकअपसाठी खूप मेहनत घेतली असून मोदींच्या भूमिकेसाठीही तितकीच मेहनत घेतली आहे हे ह्या व्हिडिओमधून दिसतय.

पीएम नरेंद्र मोदी ह्या चित्रपटात विवेक ओबेरॉय सह बोमन इराणी, मनोज जोशी, जरीना वहाब, दर्शन कुमार आणि बरखा बिष्ट हे कलाकारही दिसतील. उमंग कुमार दिग्दर्शित ह्या फिल्मची निर्मिती संदीप सिंह, आनंद पंडित आणि सुरेश ओबेरॉय यांनी मिळून केली आहे. उमंग कुमार ने याआधी 'सरबजीत' आणि 'मेरीकॉम' यांसारखे बायोपिक केले आहेत.