PM Narendra Modi Trailer 2: शंखाच्या निनादाने दुमदुमून उठणारा 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर
Pm Narendra Modi Trailer 2 (Photo Credits: Twitter)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' ह्या चित्रपटाच्या ट्रेलरचा युट्यूबवर लपंडाव सुरु असतानाच ह्या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ह्या ट्रेलरमध्ये आपल्याला नरेंद्र मोदींचा चहावाला ते पंतप्रधान पदापर्यंतचा खडतर प्रवास पाहायला मिळेल. 20 मे ला ह्या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले.

PM Narendra Modi Trailer 2:

'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी' चित्रपटाचा हा नवा ट्रेलर पाहून विवेक ओबेरॉयने ह्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय असच दिसतय. तसेच ह्या ट्रेलरमध्ये पीएम मोदींचा सन्याशी होण्यापासून ते राजकारणातील प्रवेश हा प्रवास दाखविला आहे. ह्याआधी 2 वेळा ह्या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूब वरुन हटविण्यात आला होता. मात्र येत्या 24 मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे ह्या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच 20 मे ला चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर आज ह्या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

पीएम नरेंद्र मोदी ह्या चित्रपटात विवेक ओबेरॉय सह बोमन इराणी, मनोज जोशी, जरीना वहाब, दर्शन कुमार आणि बरखा बिष्ट हे कलाकारही दिसतील. उमंग कुमार दिग्दर्शित ह्या फिल्मची निर्मिती संदीप सिंह, आनंद पंडित आणि सुरेश ओबेरॉय यांनी मिळून केली आहे. उमंग कुमार ने याआधी 'सरबजीत' आणि 'मेरीकॉम' यांसारखे बायोपिक केले आहेत.

PM Narendra Modi Biopic: नागपूर येथे नितीन गडकरी आणि विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते पी.एम. नरेंद्र मोदी चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे अनावरण

24 मे ला प्रदर्शित होणा-या ह्या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग मुंबई, गुजरात, आणि उत्तराखंड सह इतर अनेक भागात करण्यात आले आहे.