The Delhi File: विवेक अग्निहोत्री 'द काश्मीर फाइल्स'नंतर या चित्रपटावर करणार काम
Vivek Agnihotri (File Image)

आधी 'द ताश्कंद फाइल्स', मग 'द काश्मीर फाइल्स' आणि आता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) 'द दिल्ली फाइल्स' (The Delhi Files) घेऊन येत आहे. खुद्द विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्री आज मोस्ट वॉन्टेड दिग्दर्शकांच्या लीस्ट मध्ये पोहचलेले आहे. विवेक अग्निहोत्रीने ट्विट करून म्हटले की, 'मला त्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला प्रेम दिले. गेल्या 4 वर्षांपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. काश्मिरी हिंदूंवरील नरसंहार आणि अन्यायाबद्दल लोकांना जागरुक करणे महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी आता नवीन चित्रपटासाठी काम करण्याची वेळ आली आहे.

इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्रीने आणखी एका ट्विटमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती शेअर केली आहे. आपल्या चित्रपटाच्या नावाचे वर्णन करताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले, 'द दिल्ली फाइल्स'. त्याच्या या घोषणेने चाहते खूप खुश दिसत आहेत. याची माहिती विवेक अग्निहोत्रीने आपल्या ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे.

Tweet

बातमीनुसार- 'द कश्मीर फाइल्स' प्रमाणेच 'द दिल्ली फाइल्स' देखील दिल्लीतील गुन्ह्यांच्या खऱ्या घटनांची कहाणी सांगेल. कारण काही वेळापूर्वी विवेक अग्निहोत्रीने ट्विट करून चित्रपटाची माहिती दिली होती. दिग्दर्शकाने लिहिले की, 'सत्य लपवणे, न्याय नाकारणे आणि मानवी जीवनाला किंमत नाही हे आपल्या लोकशाहीवरील डाग आहे. (हे देखील वाचा: कोलकात्यात चाहत्यांनी रणबीर-आलियाचे लग्न केले थाटात साजरे; अभिनेत्रीला दिले माँ दुर्गेचे रूप, पहा फोटोज)

पुढे विवेक अग्निहोत्रीने असेही लिहिले होते की - 'द दिल्ली फाइल्स' आपल्या काळातील सर्वात धाडसी आणि हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रकट करेल. हिंदी आणि पंजाबीमध्ये लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. आता चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.