Virat Anushka 2nd Wedding Anniversary:विराट अनुष्का च्या लग्नाबद्दल 'या' 5 गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Virat Kohli And Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

Lesser-known Facts About Virat Kohli Anushka Sharma's Wedding: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी कपल आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या अफेअरपासून ते लग्नानंतर त्यांच्या PDA पर्यंत ते नेहमीच चर्चेत असतात. आज सकाळी विराटने अनुष्काला या स्पेशल दिवशी विष करण्यासाठी एक खास मेसेजसुद्धा सोशल मीडियावर लिहिला आहे. तर विराट आणि अनुष्काच्या या स्पेशल दिवशी पाहूया त्यांच्या लग्नाबद्दलच्या 'या' 5 खास गोष्टी.

विराट कोहली आणि अनुष्काचे लग्न इटली मधील टस्कनी येथे झाले. त्यांनी ही जागा डेस्टिनेशन म्हणून मुद्दाम निवडली होती कारण हे जगप्रसिद्ध ठिकाण असून वर्ल्ड हेरिटेज साईट्स पैकी एक आहे.

विराट आणि अनुष्काच्या मेहंदी पासून लग्नापर्यंतच्या सर्व ड्रेसेस डिजाईन फॅशन डिजायनार सब्यसाची याने केले होते. लग्नामध्ये अनुष्काने पिंक लेहेंगा परिधान केलेला व त्यासोबतचे भरगच्च दागिने घातले होते तर विराटने बनारसी पॅटर्नची रॉ सिल्क शेरवानी घातली होती. इतकंच नव्हे तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्काचा लेहेंगा बनवायला 30 दिवसांचा कालावधी लागला होता.

अनुष्का आणि विराट यांनी बरोबर 08:51 वाजता एकाच कॅप्शन ने लग्नातील दोन वेगळे फोटो आपल्या सोशल मीडिया हॅण्डल्सवर शेअर केले होते.

बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी जो लक्झरी व्हिला बुक करण्यात आलं होता त्यातील एका रात्रीसाठी एका रूमची किंमत तब्बल 13.5 लाख रुपये आहे.

Virushka Wedding Anniversary: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी ' खास' फोटो शेअर करत दिल्या एकमेकांना लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

विराटने अनुष्कासाठी रिंग निवडताना जवळपास 3 महिने लावले होते. आणि जी रिंग त्याने अखेर फायनल केली त्याची किंमत तब्बल 1 करोड रुपये असून ऑस्ट्रियामधील एका सोनाराने ती बनवली आहे.