Viju Khote Passes Away: अभिनेते विजू खोटे यांचे सदाबहार डायलॉग; शोले, अशी ही बनवाबनवी ते अंदाज अपना अपना
Viju Khote's roles in Bollywood. (Photo Credits: YouTube)

मराठी, हिंदी आणि भारतातील विविध भाषांमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने वेगळा ठसा उमठवणारे प्रसिद्ध अभिनेते विजू खोटे (Viju Khote) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. आपल्या खास संवादफेकीमुळे ते नेहमीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय राहिले. खास करुन जगप्रसिद्ध अशा 'शोले' (Sholay) चित्रपटातील 'सरकार मैंने आपका नमक खाया हैं' हा डायलॉग प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिला. शोले चित्रपटात 'कालिया' ही व्यक्तिरेखा साखारली होती. 'अंदाज अपना अपना' (Andaz Apna Apna) या चित्रपटातही विजू खोटे यांच्या अभिनयाचा बहारदार पैलू पाहायला मिळाला. विजू खोटे यांचे गाजलेले काही डॉयलॉग्ज खास आमच्या वाचकांसाठी.

'सरकार मैंने आपका नमक खाया हैं'

आपण अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा 'शोले' हा चित्रपट पाहिलाच असेन. या चित्रपटात जया बच्चन, हेमा मिलीनी, अहमजद खान, संजिव कुमार यांच्यासह अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे. यात गब्बर याने एका डॉनची भूमिका साकारली आहे. विजू खोटे या डॉनचे सहकारी असतात. ज्याचे नाव 'कालिया' असे आहे आणि त्यांचा डायलॉग आहे 'सरकार मैंने आपका नमक खाया हैं'

अंदाज अपना अपना

'अंदाज अपना अपना' चित्रपटात खोटे यांनी रॉबर्ट नावाची व्यक्तिरेखा साखारली आहे. या चित्रपटातील त्यांचा 'गलती से गलती हो गया' हा डायलॉग प्रचंड गाजला. (हेही वाचा, शोले सिनेमात कालिया साकारणाऱ्या विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास)

अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी हा मराठीतील एक सदाबहार चित्रपट. या चित्रपटातही विजू खोटे यांनी सुंदर अभिनय केला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी आपले योगदान दिले आहे. त्या कलाकारांना त्यांच्या खास शैलीसाठी ओळकले जाते. अभिनेते विजू खोटे यांनादेखील त्यांच्या अभिनय कारकीर्द आणि खास स्वभाववैशिष्ट्यासाठी ओळखले जाईल यात शंका नाही.