Nora Fatehi Viral Video: पहिल्याचं ऑडिशनमध्ये कास्टिंग डायरेक्टरच्या मागणीवरून नोरा फतेहीने केलं होतं असं काहीतरी; सोशल मीडियावर व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ
Nora Fatehi (PC - You Tube)

Nora Fatehi Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या स्टाईलने चाहत्यांना भूरळ पाडते. नोरामध्ये सुरुवातीपासूनच टॉक ऑफ द टाऊन बनण्याची प्रतिभा आहे. आता अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओतील नोराचा लूक पाहिल्यानंतर, ती नोरा फतेही आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. परंतु, जेव्हा तुम्ही तिची कृती पाहाल तेव्हा तुम्ही तिला लगेच ओळखू शकालं. हा व्हिडिओ नोराच्या पहिल्या ऑडिशनचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये तिचा परिचय दिल्यानंतर, दिग्दर्शकाच्या मागणीनुसार नोराने केलेला अभिनय पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. (हेही वाचा - Viral Video: रहाट पाळण्यात बसायला खूपचं उत्सूक होता मुलगा, उंचावर पोहोचल्यावर ओरडायला लागला मम्मी-पप्पा; पहा मजेशीर व्हिडिओ)

दरम्यान, नोरा फतेहीचा हा व्हिडिओ स्ट्रगलच्या दिवसांचा आहे. त्यावेळी नोराने बॉलिवूडमध्ये पाऊलही ठेवले नव्हते. या व्हिडिओमध्ये नोराला ओळखणेही कठीण होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री विना मेकअप अतिशय साधी मुलगी दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला नोरा एका बोर्डवर स्वतःबद्दलची माहिती सांगताना दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला नोरा फतेही स्वतःची ओळख करून देते आणि तिच्या वयाबद्दलही सांगत आहे. या व्हिडिओच्या वेळी नोरा फतेही फक्त 20 वर्षांची होती. व्हिडिओमध्ये नोरा फतेही वेगवेगळ्या परिस्थितींवर अभिनय करताना दिसत आहे. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ नेटिझन्स पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. नोरा आपल्या हॉट आणि बोल्ड लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय नोराचे चाहते अभिनेत्रीशी संबंधित नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.