Sarath Babu (PC- Twitter)

Sarath Babu Passed Away: दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू (Sarath Babu) निधन झाले. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साऊथ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. गेल्या महिन्यात त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 220 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा जन्म 31 जुलै 1951 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. त्यांचे खरे नाव सत्यम बाबू दीक्षित होते. आज म्हणजेच सोमवारी शरत बाबू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना प्रथम बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर महिनाभराहून अधिक काळ उपचार सुरू होते. यापूर्वी 3 मे रोजी त्यांच्या निधनाची अफवा कानावर आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही बातमी चुकीची सांगितली होती. (हेही वाचा - Anupam Kher Injured: 'विजय 69' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर जखमी; म्हणाले, खांद्याला दुखापत झालीय)

शरत बाबूने 1973 मध्ये तेलुगू चित्रपट राजा राजाममधून पदार्पण केले. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना प्रतिष्ठेचा 'नंदी पुरस्कार'ही मिळाला होता. नुकतेच ते पवन कल्याणच्या 'वकील साब' या चित्रपटात दिसले होते. त्यांनी रजनीकांत आणि कमल हासन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.