Vaibhav Tatwawaadi ने शेअर केला मणिकर्णिका सिनेमातील त्याचा  'पुरण सिंग' लूक
vaibhav tatwawaadi ने शेअर केला मणिकर्णिका सिनेमातील त्याचा 'पुरण सिंग' लूक (Photo Credits: Instagram/ vaibhav Tatwawaadi )

मणिकर्णिका (Manikarnika) या आगामी सिनेमातून झाशीच्या राणीचा झंझावाती इतिहास रुपेरी पडद्याच्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे. मराठमोळा कलाकार वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwawaadi) या सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव ' मणिकर्णिका' सिनेमात 'पूरणसिंग'ची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री अंकीता लोखंडे (Ankita Lokahande)  सोबत वैभव या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अंकिता झलकारी बाईच्या भूमिकेत आहे. तर राणी लक्ष्मीबाईच्या प्रमुख भूमिकेत कंगना रनौत (Kangana Ranaut) दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच 'मणिकर्णिका' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या सिनेमाच्या भव्यतेची झलक ट्रेलरमधूनच रसिकांसमोर आली आहे. वैभव तत्त्ववादीने यापूर्वीही बाजीराव मस्तानी या बॉलिवूड सिनेमामध्येही एक ऐतिहासिक पात्र साकारलं होतं. 'पूरणसिंग ' या तो साकारत असलेल्या भूमिकेची पहिली झलक त्याने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गावरान अंदाजात पहिल्यांदाच वैभव रसिकांसमोर येणार आहे.  Manikarnika: The Queen of Jhansi सिनेमातील 'झलकारी बाई'च्या भूमिकेतील Ankita Lokhandeचा पहिला फोटो

 

View this post on Instagram

 

Puran Singh and Jhalkari Bai 🎬🎬 #VTofficial#Manikarnika

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

'मणिकर्णिका' सिनेमामध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेत्री कंगना रनौत दिसणार आहे. यासोबतच अतुल कुलकर्णी 'तात्या टोपे', सुरेश ऑबेरॉय 'बाजीराव', डॅनी डॅन्झोप्पा 'नाना साहेब', जिशू सेनगुप्ता 'गंगाधरराव' यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  हा सिनेमा 25 जानेवारीला रीलिज होणार आहे.