Manikarnika The Queen Of Jhansi Trailer : मणिकर्णिका (Manikarnika) म्हणजेच झाशीच्या राणीचा झंझावाती इतिहास आपण अनेकदा पुस्तकातून वाचला असेल पण लवकरच रूपेरी पडद्यावर त्याची झलक पहायला मिळायला आहे. अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला रीलिज होणार आहे. इंग्रजी सैन्याशी एकहाती लढणार्या लक्ष्मीबाईंचा (Laxmi Bai) पराक्रमी इतिहास या सिनेमातून रसिकांसमोर ठेवण्यात येणार आहे. यासाठी कंगनाने अॅक्शन सिक्वेन्ससाठी विशेष मेहनत घेतली आहे. मुंबईत या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी भव्य सोहळा पार पडला.
Experience and relive the proudest chapter in our history⚔
Presenting the epitome of a warrior, a mother and a Queen, #ManikarnikaTrailer out now: https://t.co/eRjCoCGvmo#KanganaRanaut @anky1912 @Jisshusengupta @DirKrish @shariqpatel @KamalJain_TheKJ @ZeeStudios_ #JhansiKiRani
— Zee Studios (@ZeeStudios_) December 18, 2018
'मणिकर्णिका' सिनेमामध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेत्री कंगना रनौत दिसणार आहे. यासोबतच अतुल कुलकर्णी 'तात्या टोपे', सुरेश ऑबेरॉय 'बाजीराव', डॅनी डॅन्झोप्पा 'नाना साहेब', जिशू सेनगुप्ता 'गंगाधरराव' यांच्या भूमिकेत दिसणार आहे. Manikarnika: The Queen of Jhansi सिनेमातील 'झलकारी बाई'च्या भूमिकेतील Ankita Lokhandeचा पहिला फोटो
झी स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. शुटिंग दरम्यान हा सिनेमा वादाच्या भोवर्यात अडकला होता. मणिकर्णिका सिनेमाचं दिग्दर्शन सुरूवातीला क्रिश (Krish)करणार होते. मात्र सिनेमाचं शेड्युल रेंगाळल्याने कंगणा आणि दिग्दर्श्कामध्ये वाद झाला. 70% सिनेमा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शेड्युलची जबाबदारी कंगणाने स्वीकारली.