Kangana Ranaut, Urmila Matondkar (Photo Credits: File Image)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार (Soft Porn Star) म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने 'शिवाजी महाराज अमर रहें' असे म्हटले आहे. तसंच 'जय महाराष्ट्र, जय हिंद'चा ही नारा तिने दिला.

उर्मिला मातोंडकर हिने शिवाजी महाराजांच्या फोटोसह एक विचार मांडला. 'प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है. संयम ही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है शिवाजी महाराज अमर रहें.' याचा अर्थ असा की, 'सूडवृत्ती, बदला घेण्याची प्रवृत्ती मानवाला जाळत राहते. सूडवृत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा संयम हा एकच उपाय आहे.'

Urmila Matondkar Tweet:

पहा काय म्हणाली होती कंगना रनौत?

उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार असून मला ठाऊक आहे ती तिच्या अभियन कौशल्यामुळे कधीच कोणाच्या लक्षात राहणार नाही. मग ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्न, बरोबर?, असे कंगना आपल्या मुलाखतीत म्हणाली.

उर्मिला मातोंडकर हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती बद्दल बोलताना कंगना म्हणाली की, "मी उर्मिलाची मुलाखत पाहिली. संपूर्ण मुलाखतीत ती माझा अपमान करत होती. ती माझ्या संघर्षाची चेष्टा करत होती. तसंच मी भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले. पण तिकीट मिळवण्यासाठी मला माझं आयुष्य, मालमत्ता उद्धवस्त करण्याची काय गरज आहे. जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही? कोणालाही तिकीट मिळू शकतं आणि ते सगळ्यांना मिळत आहे." (Kangana Ranaut On Jaya Bachchan: जर माझ्या जागी श्वेता किंवा अभिषेक असता तर तुमची भूमिका समान राहिली असती का? कंगना रनौतचा जया बच्चन यांना सवाल)

कंगना रनौत ही आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर देखील तिने खुलेपणाने बोलायला सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याने हा वाद अधिकच पेटला.