URI Trailer:  'नया हिन्दुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी'
‘Uri’ Trailer Released | (Photo Credits: YouTube)

URI Trailer: विक्की कौशल(Vicky Kaushal), यामी गौतम (Yami Gautam), परेश रावल (Paresh Rawal), कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आणि मोहित रैना (Mohit Raina) यांच्या अभिनयाचे विविध पैलू दाखवणार आणि तितकेच दमदार कथानक असलेला 'उरी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च (‘Uri’ Trailer Released) झाला आहे. हा ट्रेलर युट्युबवर उपलब्ध आहे. ट्रेलर रिलीज करताना लिहिले आहे की, 'आजपर्यंत आमच्या सहनशीलतेला आमची कमजोरी समजले जात होते. पण, आता नाही... हा नवा हिंदुस्तान आहे. हा हिंदुस्तान घरात घुसेलही आणि मारेनही'. हा चित्रपट 'उरी' (Uri), 'सर्जिकल स्ट्राईक' (Surgical Strike) या सत्य घटनांवर आधारीत आहे. उरी हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता.

हा चित्रपटात विक्की कौशल इंडियन फोर्स कमांडोच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विक्की कौशलच्या इतर चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. त्याचा हा कमांडो लूक त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावण्याची शक्यता आहे. तर, यामी गौतमनेही बहारदार अभिनय केल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात यामी गौतम हिच्या भावमुद्रा पाहण्यासारख्या आहेत. अभिनेते परेश रावल यांच्याबाबत तर बोलायला जागाच नाही. कारण या कसदार अभिनेत्याचा अभिनय याही चित्रपटात जबरदस्तच झाला आहे. (हेही वाचा, वर्षाखेरीस रसिकांसाठी या '4' मराठी सिनेमांची मेजवानी!)

आदित्य धारने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी 11 जानेवारी 2019 या दिवशी प्रदर्शित होणार आहे.