
गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात अभिनेत्री उर्फी जावेद विरुध्द भाजप नेते चित्रा वाघ असा सामना रंगला आहे. उर्फी जावेदच्या तोडक्या कपड्यांबाबत चित्रा वाघ चांगल्याचं आक्रमक झाल्याचं दिसत आहे. गेले काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली असुन उर्फीवर तात्काळी कारवाई करण्याची मागणी केली होती. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करण्याचा कुणी विचार केला नसेल असा प्रकार उर्फी करत असल्याचं चित्रा वाघ याचं मत आहे. या अभिनेत्रीने आपल्या खासगी आयुष्यात हवं ते करावं पण असा स्त्री देहाचा बाजार मांडू नये अशी भुमिका वाघ यांनी व्यक्त केली आहे. आता मुंबई पोलिसांनी अभिनेत्री उर्फी जाधव विरोधात सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. त्यामुळे उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीनंतर आज अभिनेत्री उर्फी जावेदने जबाब नोंदवला आहे. पोलिसांना जबाबात उर्फी म्हणाली, मी एक स्वातंत्र्य व्यक्ती आहे. मला शूट करायला आणि विशिष्ट ड्रेस घालायला आवडते. या घटनेत कुठलाही गुन्हा नाही. जेव्हा मी अशा शूटसाठी बाहेर पडते तेव्हा पापाराझी मला शोधतात,मला फॉलो करतात, ते फोटो क्लीक करतात आणि मग फोटो व्हायरल होतात. मी ते व्हायरल करीत नाही असा जबाब नोंदवत स्वतच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंचे खापर उर्फीने पापाराझींवर फोडले आहे. (हे ही वाचा:- Urfi Javed: सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फी जावेदला नोटीस; मुंबई पोलिसांनी घेतली चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल)
तोकडे कपड्यांवरून चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात चांगलीचं जुगबंदी रंगली आहे. तर आता हा वाद थेट कायदा व्यवस्थेत येवून ठेपली आहे. पोलिसांच्या नोटीसीनंतर आणि अभिनेत्री उर्फी जावेदच्या अनोख्या जबाबानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वादचे काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.