Ramdas Athawale Meets Govinda: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सोमवारी अभिनेता गोविंदा (Govinda)ची त्याच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. गोविंदाला शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. अभिनेत्याला गोळीबारात दुखापत झाल्यानंतर मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोविंदाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी हॉस्पिटलला भेट दिली. अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हॉस्पिटलबाहेर अभिनेत्याच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसली होती.
अभिनेता गोविंदा 1 ऑक्टोबर रोजी स्वत:च्याच रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागल्याने जखमी झाला होता. ही घटना पहाटे 4.45 च्या सुमारास घडली. अचानक त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर निसटली. त्यामुळे बंदुकीतील गोळी अभिनेत्याच्या पायाला लागली. ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. (हेही वाचा - Govinda Discharged From Mumbai Hospital: गोविंदाला मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज; चाहत्यांचे मानले आभार, पाहा व्हिडिओ)
रामदास आठवले यांनी गोविंदाची भेट घेतली, पहा व्हिडिओ -
In Visuals: Union Minister Ramdas Athawale met with actor Govinda at his residence pic.twitter.com/oDMMKayUQc
— IANS (@ians_india) October 7, 2024
बॉलीवूडमधील लाडकी व्यक्तिरेखा असलेल्या गोविंदाने 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गोविंदाने त्याच्या दमदार डान्स मूव्ह्स आणि कॉमेडी डायलॉगमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळवली. 'इलझाम,' 'मरते दम तक,' 'खुदगर्ज, 'दरिया दिल, 'जैसी करनी वैसी भरनी,' 'स्वर्ग' यासारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जातो.