Twinkle Khanna ने Mother's Day निमित्त शेअर केलेल्या फोटोवरुन ट्रोल करणा-याला अभिनेत्रीने दिले 'हे' मजेशीर उत्तर
Twinnkle Khanna and Dimple Kapadia (Photo Credits: Instagram)

जगभरात 9 मे रोजी मातृदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेकांनी सोशल मिडियावर आपल्या आईसोबतचे फोटोज शेअर केले. अनेक कलाकारांनी देखील आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करुन मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने आपल्या आईसोबत एक हटके फोटो शेअर केला. हा फोटो पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केले. तर काहींनी ट्रोल केले. मात्र ट्विंकलच्या या फोटोवर एकाने 'तुझ्याकडे फोटो काढण्याचे कुठले डिवाईस आहे का?' असा प्रश्न विचारून ट्रोल केले. मात्र ट्विंकलने नेहमीप्रमाणे आपल्या अनोख्या अंदाजात या ट्रोलरला  (Troller) उत्तर दिले.

ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केलाय. या फोटोत एका सोफ्यावर ट्विंकल आणि तिची आई अभिनेत्री डिंपल कापडिया बसलेल्या दिसत आहेत. दोघीही आपापल्या कामात व्यस्त दिसतायत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ट्विंकल म्हणालीय,” सध्याच्या परिस्थितीत अगदी उत्तमरित्या मातृदिन पार पडला. आम्ही दोघी आमचे हात स्थिर ठेवू शकत नाही. ती स्केचिंग करतेय. मी माझं एम्ब्रोडरी वर्क करतेय आणि आम्ही दोघी यात पूर्ण वेळ गप्पा मारतोय..मातृदिनाच्या शुभेच्छा” असं कॅप्शन देत तिने आईसोबत कसा वेळ घालवला हे सांगितलंय.हेदेखील वाचा- Mother's Day निमित्ताने Kareena Kapoor ने तैमुरसह शेअर केला आपल्या दुस-या बाळाचा फोटो

Twinnkle Khanna and Dimple Kapadia (Photo Credits: Instagram)

ट्विंकलच्या या फोटोवर एक चाहता म्हणाला, "तू असे फोटो कसे क्लिक करतेस? तू कुणाला हे फोटो काढायला सांगतेस का की तुझ्याकडे असे फोटो काढण्यासाठी खास डिव्हाइस आहे?" चाहत्याने विचारलेल्या या खोचक प्रश्वावर ट्विंकलने देखील मजेशीर उत्तर दिलंय.

ट्विंकल खन्ना या युजरला म्हणाली, "हाहाहा.. माझ्याकडे एक नवरा आहे जो असे काही फोटो घेत असतो. त्यामुळे हो दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर माझ्याकडे एक खास डिव्हाइस आहे." असं मजेशीर उत्तर ट्विंकलने युजरच्या प्रश्नावर दिलंय.

ट्विंकल खन्ना सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. तसेच आपल्याला व आपल्या कुटूंबाला विनाकारण ट्रोल करणा-यांना ती सडेतोड उत्तर देते. तिचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. ट्विंकलचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.