व्यापारी राजेश्वर उदानी हत्या प्रकरण: टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य पोलिसांच्या ताब्यात
Devolina Bhattacharya | (Photo Courtesy: Instagram)

मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी राजेश्वर उदानी (Rajeshwar Udani) याच्या हत्या प्रकरणात राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ( Prakash Mehta) यांचा माजी सचिव सचिन पवार (Sachin Pawar) याला आगोदरच अटक केली आहे. त्यानंतर आता या हत्या प्रकरणात टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य (Devolina Bhattacharya) हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देवोलिना आणि सचिन पवार हे दोघे गुवाहाटी येथे होते. मुंबई विमानतळावर आगमन होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणात देवोलिनाचा हात आहे का? याबाबत पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतले आहे. 'साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya) या हिंदी मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत ती गोपी बहु हे गाजलेली व्यक्तिरेखा साकारत होती.

दरम्यान, राजेश्वर उदानी (वय 57 वर्षे) हे 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. उदानी यांच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलिसांत उदानी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. उदानी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तपास सुरु केला. दरम्यान, नेरे या गावातील जंगलात पोलिसांना एका व्यक्तिचा मृतदेह सापडला. सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पण, मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि बेल्टवरुन हा मृतदेह राजेश्वर उदानी यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले.

दरम्यान, उदानी हत्या प्रकरणाची व्यप्ती हळूहळू वाढत असून प्रकरणाचे गूढही उकलत आहे. पोलिसांनी या प्रकरणात या आधी काही बारबाला आणि प्रकाश मेहता यांचा माजी सचिव असलेल्या सचिन पवार यांचीही चौकशी केली आहे. सचिन पवाराल अटक झाल्याने सध्या तोप पोलिसांच्या ताब्यात आहे. (हेही वाचा, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’,‘पॅडमॅन’चित्रपटांची निर्माती प्रेरणा अरोरा हिला फसवणुक प्रकरणात अटक)

दरम्यान, सचिन पवार याच्याशी आपला काहीच संबंध नसल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटले आहे. 2004 ते 2009 या काळात तो माझ्याकेड सहाय्यक म्हणून कारत होता. मात्र, पक्षविरोधी कार्य केल्याने त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले. तेव्हापासून त्याचा आणि माझा संपर्कच आला नाही, असे मेहता यांनी म्हटले आहे.