महेश बाबू (Mahesh Babu) यांनी नुकतेच 'मेजर' (Major) चित्रपटाच्या ट्रेलर (Trailer) लॉन्चवेळी एक धक्कादायक विधान केले होते. बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये काम करण्याच्या त्याच्या योजनांबद्दल विचारले असता, 'बॉलिवुड त्याला परवडणार नाही' असे महेश बाबूने सांगितले. त्याच्या या विधानाने चित्रपटसृष्टीत एक नवीनच वाद सुरू झाला. मात्र, नंतर महेश बाबू यांनी या विधानाबद्दल माफी मागितली. मात्र सोशल मीडियावर (Social Media) अजूनही याच विषयावर चर्चा रंगत आहेत. आता, पान मसाला ब्रँडचा प्रचार करणार्या महेश बाबूच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेऊन नेटिझन्स निर्दयपणे त्यांना ट्रोल करत आहेत. गेल्या वर्षी, महेश बाबू टायगर श्रॉफसोबत पान मसाला ब्रँड जाहिरातीचा भाग होता. युजर्सनी आता महेश बाबूला त्या जाहिरातीवर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, "बॉलिवुड महेश बाबूला परवडत नाही, पण पान मसाला परवडू शकतो."
महेश बाबू यांचे वक्तव्य
अभिनेता महेश बाबू या कार्यक्रमादरम्यान म्हणाला होता की, "मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याच्या अनेक ऑफर आल्या आहेत. तथापि, मला विश्वास आहे की ते मला परवडणार नाही, आणि मी त्याचा विचारही केला नाही. मी नेहमीच येथे चित्रपट बनवण्याची आणि त्यांना वाढताना पाहण्याची कल्पना केली आहे, आणि ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे. मी तिथे जास्त आनंदी होऊ शकत नाही." (हे देखील वाचा: अभिनेत्री-निर्माती Pooja Bhatt चा PETA India कडून मोठा सन्मान; ठरली 'हा' पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शक)
चाहत्यांकडून महेश बाबूचा बचाव
महेश बाबूच्या चाहत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा बचाव केला आणि दावा केला की त्यांनी नेहमीच एकच प्रतिक्रिया दिली आहे, परंतु आता अतिशयोक्ती केली जात आहे. त्याच्या एका चाहत्याने लिहिले की, "एखाद्याला ठराविक ठिकाणी काम करायचे नसेल, तर ती व्यक्ती त्यांचा आदर करत नाही असे आपण का मानतो?" दुसर्याने लिहिले, "आम्ही कलाकारांच्या प्रत्येक विधानावर वाद का निर्माण करतो."