The Big Bull Trailer Release: अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांच्या 'द बिग बुल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ
The Big Bull Trailer Release (Photo Credits: Instagram)

The Big Bull Trailer Release: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)चा बहुप्रतिक्षित ‘द बिग बुल’ (The Big Bull) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 3 मिनिट आणि 8 सेकंदाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटातील अभिषेक बच्चनचा लूक आणि स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली आहे. याशिवाय यात इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) पत्रकाराच्या भूमिकेत शोभून दिसत आहे. 'द बिग बुल' च्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा अभिषेक बच्चनचा स्वैग आवडला आहे. दुसरीकडे ट्रेलरमध्ये बरेच दमदार संवाद ऐकायला मिळत आहेत. यासह चित्रपटातील अभिषेक आणि इलियानाची केमिस्ट्रीही चाहत्यांना भावली आहे. (वाचा - Mirzapur 3 ची तयारी सुरु? अभिनेत्री Shweta Triptahi ने पोस्टर शेअर करत दिले खास संकेत (See Post))

'द बिग बुल'चा ट्रेलर यु ट्यूबर कॅरी मिनाटीच्या चाहत्यांसाठीही खूप खास आहे. या ट्रेलरच्या पार्श्वभूमीवर कॅरी मिनाटी यांचे 'यलगार' गाणेही ऐकू येत आहे. काही काळापूर्वी कॅरीचे यलगार हे गाणे प्रसिद्ध झाले होते, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते आणि यूट्यूबवर ट्रेंड झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, यापूर्वी 16 एप्रिल रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या चित्रपटात मुंबईतील 1987 च्या सर्वात मोठ्या घोटाळ्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. द बिग बुल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 8 एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.