Jayeshbhai Jordaar Trailer Release (PC - You Tube)

Jayeshbhai Jordaar Trailer Release: रणवीर सिंग (Ranveer Singh) च्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. जयेशभाई बनून रणवीर मजेशीर पद्धतीने सामाजिक संदेश देत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांच्या रणवीर सिंगकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

रणवीर सिंगचा मोस्ट अवेटेड चित्रपट जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) चा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये सामाजिक संदेशासोबतच मनोरंजनाचाही पूर्ण डोस पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये कॉमेडीसोबतचं समाजाला एक संदेशही दिला जात आहे. या चित्रपटात रणवीरसोबत शालिनी पांडे (Shalini Pandey), बोमन इराणी (Boman Irani)आणि रत्ना पाठक (Ratna Pathak)यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा सिनेमा दिव्यांग ठक्करने दिग्दर्शित केला आहे. दिव्यांगचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. निर्माता आदित्य चोप्राचा हा चित्रपट यावर्षी 13 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. (हेही वाचा - The Kashmir Files OTT Release: विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित; लवकरच टीव्हीवरही दाखवण्यात येणार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला आहे. क्लिप शेअर करताना त्याने लिहिले आहे, 'जयेशभाई जोरदारचा ट्रेलर पहा. 13 मे रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये.' रणवीरच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सही कमेंट करत आहेत. बहुतेकांनी चित्रपटाचा ट्रेलर अप्रतिम असल्याचे सांगितले आहे.

चित्रपटाची कथा समाजातील मुलगी आणि मुलगा यांच्यातील भेदभावावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, जयेशभाई म्हणजेच रणवीर एका मुलीचा बाप आहे आणि त्याची पत्नी पुन्हा आई होणार आहे. कुटुंबाला मुलगा हवा आहे. शेवटी जयेशभाईंच्या घरी काय येते? मुलगा की मुलगी, यावर संपूर्ण चित्रपट आधारित आहे.

रणवीर सिंगच्या या चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारी 2020 मध्येच पूर्ण झाली होती, पण कोरोनाला संसर्ग लक्षात घेऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आता हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.