Bheed Poster (PC - Instagram)

Bheed Trailer Removed From YouTube: कोरोनामुळे देशभरात 2020 आणि 21 मध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे इतर राज्यात राहणारे लोक आपापल्या घराकडे धावत होते. अनेक मजूरांनी तर चालत जाऊन हजारो किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं घरं गाठलं. लोकांना खायला अन्न देखील मिळत नव्हते. दुसरीकडे विषाणूमुळे लोक मोठ्या प्रमाणात मरत होते. स्मशानभूमीवर चिता जाळण्यासाठी मृतदेहांची रांग लागली होती. आजही हे भयानक दृश्य आठवले की सगळे घाबरतात. दिग्दर्शक अनुभव सिन्हा (Director Anubhav Sinha's) यांचा भीड (Beed) हा चित्रपटही यावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला होता, मात्र आता आठवडाभरानंतर तो यूट्यूबवरून हटवण्यात आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर गदारोळ सुरू झाला आहे.

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भीड' चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात यूट्यूबवर प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सुरुवातीला वादाच्या फैरी झाडण्यात आल्या. मात्र काही दिवसांतच या ट्रेलरला यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले. पण काही वेळातच यूट्यूबवरून ट्रेलरची लिंक गायब झाली आहे.  (हेही वाचा -Bheed: 'अनुभव सिन्हाच्या' 'भिड'मध्ये राजकुमार रावसोबत दिसणार 'भूमी पेडणेकर')

यूट्यूबवरून ट्रेलर हटवण्यामागे विविध कारणे समोर येत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, चित्रपट कोविड लॉकडाऊन सादर करत असलेल्या दंडनीयतेमुळे असे होऊ शकते. आणखी एका युजरने लिहिले की, 'असे दिसते की कोणीतरी खूप शक्तिशाली माणूस या चित्रपटावर खूप नाराज आहे. बॉयकॉट टोळी लवकरच सक्रीय होईल, अशी माझी अपेक्षा आहे.' मात्र, अद्याप निर्मात्यांनी याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल अनेक वादविवाद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लॉकडाऊन धोरणावरून सरकारवर अनेकदा टीका झाली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी 'भीड' या चित्रपटात त्या काळातील चित्र अगदी त्याच पद्धतीने मांडले आहे.