Total Dhamaal Song Paisa Ye Paisa: 'टोटल धमाल' सिनेमातून नव्या अंदाजात आलंय ऋषी कपूर यांचं 'पैसा ये पैसा' गाणं
Paisa Yeh Paisa Song (Photo Credits: You Tube)

Total Dhamaal Song Paisa Ye Paisa: सिम्बा सिनेमातील 'आंख मारे' या गाण्याच्या रिमेकने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा अजून एका नव्या गाण्याच्या रिमेकसाठी सज्ज व्हा! 'टोटल धमाल' (Total Dhamaal) या हिंदी सिनेमामधील पहिलं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'पैसा ये पैसा'(Paisa Ye Paisa) असं या गाण्याचं नाव आहे. ऋषी कपूरच्या 'कर्ज' सिनेमातील 'पैसा ये पैसा' गाण्याचं रिमेक आणि रिमिक्स व्हर्जन 'टोटल धमाल' या सिनेमात पहायला मिळणार आहे. या गाण्यामध्ये सिनेमाची तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अर्शद वारसी (Arshad Warsi), अजय देवगण (Ajay Devgn), माधुरी दीक्षीत (Madhuri Dixit), अनिल कपुर (Anil Kapoor) पहायला मिळाले आहे. Total Dhamaal Trailer: 'टोटल धमाल'चा धमाकेदार ट्रेलर

'टोटल धमाल' सिनेमातील 'पैसा ये पैसा' गाणं - 

टोटल धमाल सिनेमामधील 'पैसा ये पैसा' हे गाणं देव नेगी, सुब्रो गांगुली आणि अर्प‍िता चक्रबर्ती यांनी गायलं आहे. तर कुंवर जुनेजा यांनी लिहलं आहे. 1980 मध्ये आलेल्या 'कर्ज' सिनेमात 'पैसा ये पैसा' हे गाणं पहिल्यांदा आलं होतं. ते मूळ गाणं किशोर कुमार यांनी गायलं आहे तर आनंद बक्षी यांनी लिहलं आहे. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन लक्ष्‍मीकांत प्‍यारेलाल या अजरामर जोडीनं केलं होतं.

'कर्ज' सिनेमातील पैसा ये पैसा गाणं - 

'टोटल धमाल' या सिनेमात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षीत ही जोडी 18 वर्षांनी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका खजिन्याच्या शोधात असलेल्या अवलियांची धम्माल मस्ती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी 2019 रोजी हा सिनेमा रीलिज होणार असून इंद्र कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.