facbook-avneet kaur and Navajun Siddiqui

Tiku Weds Sheru:  सुप्रसिध्द अभिनेता (Navajun Siddiqui ) नवाजुद्दीन सिद्दकी याचा  Tiku Weds Sheru चित्रपटाचा ट्रेलर लाॅंच झाले आहे.  या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री (Avneet Kaur) अवनीत कौरल दिसणार आहे. ह्या चित्रपटातील  मुख्य भुमिकेत नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या मार्फत कंगणाने चित्रपट निर्मितीसाठी पाउल टाकले आहे. ड्रामा आणि लव स्टोरीने भरलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफाॅर्मवर बघायला मिळणार आहे.

ह्या चित्रपटात प्रेक्षकांना नवाजुद्दिनचे नवी भुमिका पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच ही जोडी चित्रपटासाठी काम करणार आहे, छोट्या पडद्यावर काम करणारी अवनीत कौर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.  अवनीत कौरने ह्या आधी अनेक छोट्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अवघ्या २१ व्या वर्षी अवनीत कौर बाॅलिबूडमधल्या सुप्रसिध्द कलाकार नवाजुद्दीन सिद्दकी सोबत काम करतना दिसणार आहे.

ह्या चित्रपटात टिकू आणि शेरूची लव स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना अवनीत कौरची भुमिका पाहायला उस्तुकता लागली आहे.   येत्या २३ जूनला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.