सध्या सोशल मिडियावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची (Kangana Ranaut) मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आपली विवादित वक्त्यव्ये आणि व्हिडीओ यामुळे ती नेहमीच माध्यमांना खाद्य पुरवत असते. आता एका नव्या मुद्द्यावरून अभिनेत्री चर्चेत आहे. कंगनाने नुकतेच आपल्या रेस्टॉरंट व्यवसायाची घोषणा केली होती. त्यानंतर आता ती डिजिटल डेब्यू (Digital Debut) करणार आहे. एक निर्माता म्हणून डिजिटल व्यासपीठावर पाऊल ठेवण्यासाठी कंगना सज्ज झाली आहे. कंगना रनौत तिचे प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली 'टीकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) ची निर्मिती करणार आहे. शनिवारी कंगनाने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा लोगोही सादर केला.
याबाबत कंगना रनौतने सांगितले की, 'टीकू वेड्स शेरूसह मणिकर्णिका फिल्म्स डिजिटल स्पेसमध्ये पाऊल टाकणार आहेत. ही एक प्रेम कथा आहे, ज्यात डार्क ह्युमरदेखील आहे. आम्ही आजच्या काळातील आणखी बऱ्याच कथा डिजिटल स्पेसमध्ये तयार करु.' कंगना पुढे म्हणाली, 'याद्वारे आम्ही नवीन टॅलेंट लाँच करू आणि नव नवीन संकल्पना सादर करण्याचा प्रयत्न करू. मला वाटते की आता सिनेमा हॉलमध्ये नियमितपणे जाणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा डिजिटल कंटेंट पाहणारे प्रेक्षक अधिक वेगाने वाढत आहेत.'
Launching the logo of @ManikarnikaFP with the announcement of our debut in digital space with a quirky love story Tiku weds Sheru .... Need your blessings 🙏 pic.twitter.com/ulaMK62m7l
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 1, 2021
दुसरीकडे कंगना फूड बिझनेसमध्ये पाय ठेवत आहे. कंगना मनालीमध्ये आपले रेस्टॉरंट उघडणार आहे. हिमाचलमध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये ती आपला कॅफे आणि रेस्टॉरंटचा (Cafe and Restaurant) बिझनेस सुरु करत आहे. कंगनाने आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनालीमध्ये जमीनही खरेदी केली आहे. (हेही वाचा: Salman Khan चा चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू; येथे करू शकता बुकिंग)
दरम्यान, कंगना सोशल मीडियावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मुद्द्यंवर भाष्य करत आहे. यामुळे अनेकदा तिला ट्रोलही कले जाते. वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर, कंगना रनौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट थलाईवी 23 एप्रिल रोजी रिलीज होणार होता, मात्र देशातील कोरोना परिस्थितीमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.