SOTY 2 Trailer: टायगर श्रॉफ ह्याचा जबरदस्त अॅक्शनसह अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या सुंदर अंदाजातील चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Student Of the Year 2 (Photo Credits- Youtube)

Student  Of the Year 2 Trailer: बॉलिवूडमधील निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) ह्याचा आगामी चित्रपट 'स्टुडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff)  मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. तसेच अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria)  सुद्धा चित्रपटात दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये रोमांस आणि अॅक्शनचा धमाका दिसून येत आहेत.

तारा सुतारिया आणि अनन्या पांडे त्यांच्या अंदाजामुळे अत्यंत सुंदर दिसून येत आहेत. टायगर, तारा आणि अनन्या यांच्या प्रेमकथेचा ट्रँगल पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत स्टुडेंट ऑफ द ईयर ट्रॉफीसाठी सुद्धा लढताना दिसून येणार आहे. करण जोहर ह्याने चित्रपटाचे ट्रेलर ट्वीट सुद्धा केले आहे.

पुनीत मल्होत्रा यांनी चित्रपटाचे निर्देशन केले असून करण जोहर ह्याने निर्मिती केली आहे. तर 2012 रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या स्टुडेंट ऑफ द ईयर चित्रपटातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसून आले होते. प्रेक्षकांना हा चित्रपट खुपच आवडला होता. येत्या 10 मे रोजी चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.