Thugs of Hindostan Song : 'सुरैय्या' गाण्यात कतरिना कैफच्या दिलखेचक अदा
सुरैय्या गाण्याचा टीझर (Photo Credits: Youtube)

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमातील नवे सुरैय्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हे गाणे कतरिना कैफ आणि आमिर खान यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. गाण्यात आमिर खान फिरंगी अवतार दिसतो. तर कतरिनाचा हॉट, ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर यात कतरिनाच्या दिलखेचक अदा आणि जबरदस्त डान्स मुव्जही पाहायला मिळत आहे.

सुरैय्या हे गाणे विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल यांनी गायिले आहे. अजय-अतुल यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून अमिताभ भट्टचार्यने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

आमिर खानने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. त्यात त्याने लिहिले की, "मेरी जान तो ले चुकी है सुरैय्या."

यापूर्वी ठग्स ऑफ हिंदोस्तानमधील वाश्मल्ले नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या सिनेमात आमिर खान, कतरिना कैफ शिवाय अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमातून पहिल्यांदाच अमिताभ-आमिर एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

यशराज फिल्म्स निर्मित ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाचे दिग्दर्शन विजय कृष्णा आचार्य यांनी केले आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.