ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आला 'Jai Bhim' चित्रपट; Suriya चे चाहते म्हणाले, 'देशाची शान आहे अभिनेता'
Jai Bhim Film (PC - Twitter)

सध्या साऊथचे सिनेमे खूपचं गाजत आहे. अभिनेता सूर्या (Suriya) चा 'जय भीम' (Jai Bhim) हा चित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्याला समीक्षकांसोबतचं प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. समाजात जात आणि पोलीस व्यवस्थेच्या आधारे होत असलेल्या भेदभावाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. आता या चित्रपटाच्या कामगिरीत आणखी भर पडली असून त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे. 'जय भीम' ऑस्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आला आहे.

सोशल मीडियावर सूर्याचे चाहतेदेखील तामिळ चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत अभिनेत्याचे अभिनंदन करत आहेत. ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा हा पहिला तमिळ चित्रपट आहे. यापूर्वी 'जय भीम'ला गोल्डन ग्लोब 2022 साठी सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. हा चित्रपट 2 नोव्हेंबर 2021 रोजी थेट Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. 'जय भीम' ची कथा वकिल चंद्रू यांच्यावर प्रेरित आहे. ज्याने आपल्या प्रयत्नांद्वारे तामिळनाडूमधील मागासलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली. चित्रपटाचे दिग्दर्शन TJ Gnanavel यांनी केले आहे. (वाचा - Dhanush Aishwarya Divorce: धनुषने पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती)

चाहत्यांच्याचे ट्विट - 

दरम्यान, चित्रपटाच्या या नव्या विक्रमामुळे सूर्याचे चाहते खूश असून त्यांनी ट्विटरवर चित्रपटाचे स्क्रीनशॉट शेअर करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी एका यूजरने लिहिलं आहे की, मोठा इतिहास घडला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीला या अभिमानास्पद दिवसाबद्दल अभिनंदन. दुसर्‍याने एका यूजर्सने लिहिलं आहे, सूर्या भारताची शान आहे.