Bajrangi Bhaijaan 2: 'बजरंगी भाईजान' चित्रपटाचा लवकरच येणार सिक्वेल, निर्मात्यांने केली घोषणा
Bajrangi Bhaijaan 2 PC TWITETR

Bajrangi Bhaijaan 2: बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचे अनेक चित्रपट आजवर गाजले आहे. त्यातील एक बजरंगी भाईजान हा सर्वांच्या आवडीचा सिनेमा आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.  भाईजान आता या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी सज्ज होणार आहे.या बातमीमुळे चाहते देखील खुश झाले आहे. हा चित्रपट २०१५ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आजही या चित्रपटाचा चाहता वर्ग आहे. या चित्रपटाच दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. हेही वाचा- डिप नेक गाऊन घातल्याने अभिनेत्री रिंकू राजगुरु झाली ट्रोल

मिळालेल्या माहितीनुसार, 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाचं लवकरच सिक्वेल येणार आहे अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे. निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट तयार आहे पण चित्रपट बनवण्यासाठी अडथळा येत आहे. ९ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. चाहत्यांना आणि प्रेक्षकांना देखील आनंदाची बातमी मिळाली आहे. चित्रपटात मुख्य भुमिकेत कोण असणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आयुश शर्मा याचा 'रुसलान' चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमाच्या वेळीस सलमान खानच्या बजरंगी भाईजान 2 लवकरच बनणार असल्याची पुष्टी विजयेंद्र प्रसाद यांनी केली आहे. वेळ मिळाली की सलमान खानला कथा सांगितली जाईल आणि त्यानंतर चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती निर्मात्यांने दिली आहे. ईदच्या दिवशी आणखी एका चित्रपटाची सलमान खानने घोषणा केली होती. सिकंदर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बजरंगी भाईजान चित्रपटात अभिनेता सलमान खान यांच्या सोबत करिना कपूर खान होती परंतु येणाऱ्या दुसऱ्या भागात सलमान खान यांच्या सोबत कोण असणार असा प्रश्न चाहत्यांसमोर पडला आहे. त्यामुळे चाहत्यांनी चित्रपटासाठी उत्सुकात दाखवली आहे.