The Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)
The Kapil Sharma Show (Photo Credits: Instagram)

कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा आपल्या सेनेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या शो चा प्रोमो समोर आला असून यात प्रेक्षकांना शो मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र यासाठी एक अट लागू करण्यात आली आहे. ही अट पूर्ण केल्यावरच शो मध्ये एन्ट्री मिळणार आहे. ती अट आहे लसीकरणाची. कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccines) दोन्ही डोसेस घेतलेल्या नागरिकांचा या शो मध्ये सहभागी होता येणार आहे.

यासंदर्भातील माहिती शो चे कलाकारांनी व्हिडिओतून दिली आहे. कपिल शर्मा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लस घेतलेल्यांनाच शो मध्ये प्रवेश मिळेल, असे यातून सांगण्यात  आले आहे. तसंच लसीचे दोन्ही डोस घ्या आणि शो मध्ये सहभागी व्हा, असेही सांगून लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सीजनमध्येही जुन्याच कलाकारांची भट्टी जमून येणार आहे. काही दिवसांपूर्वी कपिलने जुन्या चेहऱ्यांसोबत नवी सुरुवात अशी पोस्ट करत शो पुन्हा ऑन एअर होणार असल्याची घोषणा केली होती. नव्या सीजनमध्ये कपिलसोबत भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुदेश लहरी हे कलाकार दिसून येणार असून अर्चना पूरणसिंह जजची खुर्ची सांभाळणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी हा शो ऑफ एअर करण्यात आला होता.